राज ठाकरेंच्या घरी काम करणाऱी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

साम टीव्ही
शनिवार, 27 जून 2020

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दोन ड्रायव्हर्सना कोरोना झाल्याचा प्रकार ताजा असतानाच. आता थेट त्यांच्या घरी काम करणाऱी व्यक्तीच कोरोना पॉझिटिव्ह आढळलीय.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दोन ड्रायव्हर्सना कोरोना झाल्याचा प्रकार ताजा असतानाच. आता थेट त्यांच्या घरी काम करणाऱी व्यक्तीच कोरोना पॉझिटिव्ह आढळलीय.. या सर्व कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 या आधी राज ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी कृष्णकुंज निवासस्थानी तैनात असलेल्या तीन सुरक्षा रक्षकांना देखील कोरोनाची लागण झाली होती. दादरमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत चालल्याचं दिसून येतंय. दादरच्या शिवाजी पार्क परिसरात राज ठाकरे यांचे कृष्णकुंज हे निवासस्थान आहे.

राज्यात शुक्रवारी सर्वाधिक 5  हजार 24 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झालीय...तर  175 करोना बाधिताचा मृत्यू झालाय. यापैकी 91 मृत्यू मागील ४८ तासातील आहेत तर 84 मृत्यू मागील कालावधीतील आहेत. राज्यातील मृत्यू दर 4.65 % आहे.

दरम्यान काल 2 हजार 362 रुग्ण बरे होऊन घरी परतले, आतापर्यंत एकूण 79 हजार 815 जण करोनामुक्त झालेत. तर 65 हजार 829  ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.. राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1 लाख 52 हजार 865 वर पोहचलीय.

दरम्यान, कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातलंय.या विषाणूने आतापर्यंत 4 लाख 96 हजार नागरिकांचा बळी घेतला आहे.तर कोरोनाग्रस्तांची संख्या 98 लाख 98 हजारावर पोहोचली असून आतापर्यंत 53 लाख 50 हजार रुग्ण बरे झालेत. जगातील जवळपास सर्व प्रमुख देश या विषाणूविरोधात लढत आहेत...दरम्यान या विषाणूला रोखण्यासाठी बहुतांश ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आलंय.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live