कोरोना सर्दी-खोकल्यासारखा सामान्य होणार; पुढील दशकासाठी अंदाज

Common Cold
Common Cold

नवी दिल्ली : गेल्या वर्षाहून अधिक काळ कोरोना साथीशी जग झुंजत असताना येत्या दशकात कोरोनाचा विषाणू सर्दी-खोकल्याच्या सामान्य विषाणूसारखा होणार असल्याचा दावा एका नव्या संशोधनात करण्यात आला आहे. ‘व्हायरसेस’ या नियतकालिकात ते प्रकाशित झाले असून संशोधकांनी कोरोनाच्या सध्याच्या साथीवर आणि मानवी शरीराच्या बदलत्या प्रतिकारशक्तीवर आधारित गणितीय प्रारूपाच्या आधारे हा निष्कर्ष काढला आहे. Corona Will be like Common Cold in Next Decade

मात्र, हे प्रारूप भविष्यातील कोरोनाच्या वाटचालीचा अचूक अंदाज वर्तवू शकत नसल्याचेही संशोधकांचे मत आहे. अमेरिकेतील उटाह विद्यापीठातील जीवशास्त्राचे प्रा.फ्रेड ॲडलर याबाबत म्हणाले,की समूह प्रतिकारशक्ती वाढल्यानंतर येत्या दशकात कोरोनाची तीव्रता कमी होऊ शकते. विषाणुतील बदलांपेक्षा मानवी प्रतिकारशक्तीतील बदलाचा कोरोना साथीवर प्रभाव पडू शकतो.

हे देखिल पहा

कोरोना साथीच्या सुरुवातीला मानवी प्रतिकारशक्ती या विषाणुसाठी तयार नव्हती. मात्र, जशी प्रौढ व्यक्तींची प्रतिकारशक्ती संसर्ग किंवा लसीकरणातून वाढत जाईल, तशी कोरोना संसर्गाची तीव्रताही कमी होत जाईल. मुले विषाणूच्या प्रथमच संपर्कात आली तरी नैसर्गिकरित्या त्यांना गंभीर आजार होण्याचा धोका कमी असतो. Corona Will be like Common Cold in Next Decade

म्युकरमायकोसिसचे इंजेक्शन उपलब्धतेनुसार मोफत देणार

कसा व्यक्त केला अंदाज
-कोरोना विषाणुविरुद्ध मानवी प्रतिकारशक्तीच्या आधारे गणितीय प्रारुप तयार केले.
- कोरोना साथीचे विश्लेषण करून अधिक लोकसंख्येला दीर्घकाळासाठी सौम्य संसर्गाची शक्यता वर्तविली.
- लस किंवा संसर्गानंतर प्रतिकारशक्ती वाढून कोरोना सौम्य होण्याचा निष्कर्ष

रशियन फ्लू’चे उदाहरण
सध्याच्या कोरोनाच्या सार्स-कोव-२ विषाणूव्यतिरिक्त इतर विषाणुंचाही मनुष्याला संसर्ग होतो. मात्र, ते कमी धोकादायक आहेत. त्यातील एखादाच सध्याच्या विषाणुसारखा तीव्र होतो. १९ व्या शतकात त्यामुळे ‘रशियन फ्लू’ची साथ आली होती, याकडेही संशोधकांनी लक्ष वेधले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com