आता फक्त 10 सेकंदात होणार कोरोनाचं निदान!

साम टीव्ही
शनिवार, 19 सप्टेंबर 2020
  • कोरोना निदानासाठी आता तासन् तास थांबण्याची गरज नाही
  • फक्त 10 सेकंदात होणार कोरोनाचं निदान
  • 10 सेकंदात कोरोना निदानासाठी चाचणी यंत्र विकसित

आता अवघ्या १० सेकंदात कोरोनाचं निदान होणार आहे. हो तुम्ही बरोबर ऐकताय. १० सेकंदात कोरोना निदान होणार चाचणी यंत्र विकसित करण्यात आलंय.

कोरोनाच्या निदानासाठी आता तासन् तास थांबण्याची गरज नाही. केवळ दहा सेकंदात कोरोनाचं निदान होऊ शकणार आहे. कोरोना अँटीबॉडी ओळखणारं एक चाचणी यंत्र विकसित करण्यात अमेरिकास्थित मराठमोळ्या शास्त्रज्ञांना यश आलंय. पेन्सिल्वेनीया प्रांतातील कार्नेजी मेलॉन विद्यापीठाचे डॉ. राहुल पानट यांच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या चमूने हे संयंत्र विकसित केलंय..

  • कोरोनाविरुद्ध कार्य करणाऱ्या अँटीबॉडीसचा शोध घेण्यासाठी रक्ताचा थेंब इलेक्ट्रोडवर टाकण्यात येतो.
  • रक्तात अँटीबॉडीस मिळाल्या, म्हणजे व्यक्तीला कोरोनाची बाधा झालीय.
  • सर्वांत जलद गतीने निदान करणारे रुपयाच्या नाण्याएवढे संयंत्र 
  • कोरोनासह भविष्यात इतर संसर्गजन्य आजारांच्या अँटीबॉडीजचं निदान शक्य होणार आहे.

व्यक्तीच्या रक्तातील कोरोना अँटीबॉडीस निदान करणाऱ्या या पद्धतीची अचूकता जास्त आहे. मोबाईलच्या आकाराच्या संयंत्रामुळे कोरोना निदानामध्ये मोठी क्रांती होणार आहे. जलद गतीनं निदान झाल्यामुळे कोरोनालाही तितक्याच जलद गतीनं आटोक्यात आणता येणार आहे.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live