कोरोना येणार हे 12 वर्षांपूर्वीच लिहून ठेवलेलं होतं?

अरूण जोशी
शुक्रवार, 6 मार्च 2020

चीनच्या वुहान शहरातून आलेला कोरोना जगभरात पसरू लागलाय. या कोरोना व्हायरसबाबत 12 वर्षांपूर्वीच भविष्यवाणी झाली होती. ही भविष्यवाणी खरी ठरली तर कोरोना ज्या वेगानं आला आहे, त्याच वेगान परतेल, असा दावा करण्यात आला आहे. 

कोरोनानं जगभरात हाहाकार माजवलाय. देशात कोरोनाचे 29 रूग्ण आढळलेत. सर्वांच्याच तोंडचं पाणी पळवणारा कोरोना व्हायरस अचानक आलेला असला तरी त्याची भविष्यवाणी ही 12 वर्षांपूर्वीच झाली होती. अमेरिकन लेखिका सिल्व्हिया ब्राउनी यांनी जुलै 2008 मध्ये एंड ऑफ डेज नावाचं पुस्तक लिहिलं होतं. कोरोना व्हायरसची लक्षणं या पुस्तकात लिहिलेल्या गोष्टींशी अगदी तंतोतंत जुळत आहेत. 

 

 

या पुस्तकात 2020 मध्ये निमोनियासारखा गंभीर आजार जगभरात पसरेल असं लिहिलंय.हा आजार फुफुस्स आणि श्वसननलिकेवर परिणाम करणार आहे. यावर कोणतेही उपचार होऊ शकणार नाहीत. ज्या वेगात हा व्हायरस पसरला जाईल तितक्याच जलद तो संपेल असंही या पुस्तकात म्हंटलंय..तसच दहा वर्षानंतर हा रोग पुन्हा परत येईल आणि स्वतःच संपून जाईल असाही उल्लेख करण्यात आलाय. 

 

कोण आहेत सिल्व्हिया ब्राउनी?
 

सिल्व्हिया ब्राउनी या मानसशास्त्रज्ञ होत्या. स्वत:ला अध्यात्मिक गुरू म्हणवून घेत त्यांनी आपल्याकडे अलौकिक शक्ती असल्याचा दावा केला होता. 2013 मध्ये त्यांचं निधन झालं.

 

कोरोनाची ही भविष्यवाणी तशी नवीन नाही. फ्रान्समधील प्रसिद्ध भविष्यवेत्ता नॅस्ट्रोडेमनं 465 वर्षांपूर्वीच या व्हायरसबद्दल भाकित केलं होतं. त्यानंतर आता एंड ऑफ डेज हे पुस्तक चर्चेत आलंय. सध्याच्या विज्ञानयुगात अशा भाकितांवर विश्वास ठेवणं कितपत योग्य आहे हा सवाल आहेच.

WebTittle :: VIDEO | Will Corona return as soon as he arrives?  corona virus will return the way it has came from today


संबंधित बातम्या

Saam TV Live