चंद्रपुरात आढळला करोनाचा पहिला रुग्ण

साम न्यूज
रविवार, 3 मे 2020

नागपूर विभागात नागपूर, भंडारा पाठोपाठ आता चंद्रपूरमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. विभागात वर्धा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण नाही. शहरात करोनाचा रुग्ण आढळताच जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून न जाता अधिक जबाबदारीने लॉकडाऊन पाळावे, असे आवाहन केले आहे. 

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात करोनाचा एकही रुग्ण नसताना जिल्ह्याचा ग्रीन ऐवजी ऑरेंज झोनमध्ये समावेश करण्यात आल्याने त्यावर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतला होता. तक्त्यात चंद्रपूरमध्ये करोनाचे तीन रुग्ण दाखवण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्षात यापैकी एकही रुग्ण सध्या चंद्रपुरात नाही. चंद्रपुरातील एका दाम्पत्याला करोना झाला आहे मात्र, हे दाम्पत्य गेल्या काही आठवड्यांपासून नागपुरात आहे तर निमलष्करी दलातील एक जवान करोना पॉझिटिव्ह असून तो सध्या दिल्लीत आहे. या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांनी ग्रीन झोनचा आग्रह धरला होता. पण शनिवारीच चंद्रपुरात करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने चंद्रपूरचे ग्रीन झोनचे स्वप्न तूर्त लांबणार आहे.चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प परिसरात असणाऱ्या कृष्णानगर भागातील हा रुग्ण असून हा संपूर्ण परिसर तातडीने सील करण्यात आला आहे. गेला दीड महिना करोनाचा शिरकाव रोखण्यात यशस्वी ठरलेल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शनिवारी करोनाचा पहिला रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. 

नागपूर विभागात नागपूर, भंडारा पाठोपाठ आता चंद्रपूरमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. विभागात वर्धा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण नाही. शहरात करोनाचा रुग्ण आढळताच जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून न जाता अधिक जबाबदारीने लॉकडाऊन पाळावे, असे आवाहन केले आहे.

परिसरात करोनाचा फैलाव होऊ नये यासाठी रात्रीच कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला. आजपासून महानगर परिसरात लॉकडाऊन आणखी कडक करण्यात येत असल्याचे, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी जाहीर केले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी शनिवारी रात्री साडेआठ वाजता करोना पॉझिटिव्ह रुग्णाबाबत माहिती दिली. ५० वर्षीय पुरुष करोना पॉझिटिव्ह आढळला असल्याचे ते म्हणाले. ही माहिती जाहीर करण्यात आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने संबंधित परिसर सील केला आहे. 

 

WebTittle ::  Corona's first patient found in Chandrapur


संबंधित बातम्या

Saam TV Live