कोरोनाच्या राक्षसाचं नवं रुप, चीनमध्ये कोोरनाच्या नव्या रुपाची धास्ती वाढली

साम टीव्ही
शुक्रवार, 22 मे 2020
  • कोरोनाच्या राक्षसाचं नवं रुप
  • चीनमध्ये कोरोनाचं नवं क्लस्टर
  • कोरोनाच्या नव्या रुपानं धास्ती वाढली

चीनमध्ये कोरोनाच्या राक्षसाचं नवं रुप समोर आलंय.. रुग्णांमध्ये लक्षणच आढळून येत नसल्याने संक्रमण अधिक वेगाने होतंय. त्यामुळे भीती दुप्पट वाढलेय. चीनमध्ये नेमकं काय सुरु आहे. पाहा...

चीनच्या जिलिन आणि हिलांगजियांग प्रांतात कोरोनाचा राक्षस नव्यानं सक्रिय झालाय. काही आठवड्यांत कोरोना व्हायरचं नवं क्लस्टर समोर आलंय. या रुग्णांमध्ये सामान्य कोरोना रुग्णांप्रमाणे लक्षणं आढळून येत नाहीत. त्यामुळे संक्रमण अधिकच भयावह बनलंय.
 वुहानमधून सुरु झालेली कोरोनाची लाट जगभरात पोहोचली.. आणि हाहाःकार माजला. तर काहीच दिवसात चीनमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याचे संकेत मिळालेत. 

 चीनमध्ये कोरोनाची दुसरी लाट

  •  
  • कोरोना विषाणूत फैलावासोबतच बदल घडतायत
  • वुहानमधल्या विषाणूत आणि आताच्या विषाणूत कमालीची तफावत आहे
  • विषाणूचा व्यवहार, संक्रमणातील लक्षणांमध्ये बदल झालेले दिसतात
  • या रुग्णांमध्ये कुठलीही लक्षणं दिसत नाहीत
  • त्यामुळे अशा रुग्णांपासून त्यांच्या कुटुंबियांना धोका अधिक आहे
  •  जगाच्या डोक्याला ताप झालेला कोरोना, एखाद्या गोष्टीतल्या राक्षसासारखी रुपं बदलतोय. त्यामुळे धोका काही कमी होण्याची चिन्हं दिसत नाहीयेत.


संबंधित बातम्या

Saam TV Live