कोरोनाच्या कटू आठवणींचं वर्ष, वाचा या एक वर्षात काय घडलं काय बिघडलं ?

साम टीव्ही
गुरुवार, 11 मार्च 2021

महाराष्ट्रातल्या कोरोना साथीचं एक वर्ष
54 हजार 556 जणांनी गमावला जीव
कोरोनाच्या कटू आठवणींचं वर्ष 

 

9 मार्च 2020.
गेल्या वर्षी याच दिवशी महाराष्ट्रातल्या पुण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला.आणि त्यानंतर सुरू झालं कटू आठवणींचं पर्व असं म्हटलं जातं की मानवी उत्क्रांतीच्या इतिहासात कोरोनाच्या या महामारीची नोंद घेतली जाईल.मानवी जीवनावरील कोरोनाच्या झाकोळाची या वाक्यावरूनच आपल्याला कल्पना येईल.

या कोरोनाने गेल्या वर्षभरात एकट्या महाराष्ट्रात 54 हजार 556 जणांचा बळी घेतलाय. तर या वर्षभरात राज्यातले तब्बल 22 लाख 40 हजार जण कोरोनाबाधित झाले. यापैकी 20 लाख 9 हजार जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केलीय. तर जगभरात तब्बल 26 लाख 10 हजार जणांचा कोरोनाने बळी घेतला.

आज वर्षभरानंतर राज्यात 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत हळूहळू सर्व व्यवहार पूर्व पदावर येतायत. पण कोरोनाची महामारी आटोक्यात येतेय, असं वाटत असतानाच राज्यात आता परत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागलीय. त्यामुळे नव्या वर्षावरही कोरोनाचं सावट हळुहळू गडद होऊ लागलंय. .


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live