#CoronaStopKaroNa नागपुरात आता बाहेरच्यांना नो एन्ट्री, आयुक्तांचा महत्त्वपूर्ण निर्णय

संजय डाफ
शुक्रवार, 20 मार्च 2020

छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुल विशेष खबरदारी नागपूर आयुक्तांकडून घेतली जाते आहे. 

नागपूर - आजपासून (20 मार्च) नागपूर जिल्ह्यातील सर्व सीमा सील करण्यात आली आहे. इतर शहरातून येणाऱ्या लोकांना प्रवेश नागपुरात प्रवेश दिला जाणार नाही आहे. तसंच विमानतळावरील प्रवाशांची कसून तपासणी कऱण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक प्रवाशाला 14 दिवस क्वारंटाईन केलं जाणार असल्याचीबी माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली आहे. 

नागपूर जिल्ह्याला लागून मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड या राज्यांच्या सीमा लागून आहे. त्यामुळे या राज्यांमधून येणाऱ्यापासून संसर्ग वाढू नये, यासाठी खबरदारी घेण्यात येते आहे. आतापर्यंत राज्यात 52 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. आज कोरोना रुग्णांच्या संख्येत तीनने वाढ झाली आहे. मात्र 5 जणांना बरंदेखील करण्यात यश आलं आहे. नागपुरात आता कोरोनाचा एकही रुग्ण नाहीये. त्यामुळे जास्तीत जास्त सतर्क राहून खबरदारी बाळगण्यात येते आहे. 

 

छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुल विशेष खबरदारी नागपूर आयुक्तांकडून घेतली जाते आहे. 

राज्यात 10 मार्चपासून कशा पद्धतीनं रुग्ण वाढत गेले?

  • 10 मार्च - 2
  • 13 मार्च - 11
  • 14 मार्च - 19
  • 15 मार्च - 31
  • 16 मार्च - 33
  • 17 मार्च - 39
  • 18 मार्च - 42
  • 19 मार्च - 49
  • आज 20 मार्च - 52 (सकाळी 11 वाजेपर्यंत)

 

नागपुरात पोलिसांकडून लोकांमध्ये जगजागृती करण्यात येतेय.

पाहा TWEET

 

 

 

पाहा व्हिडीओ - 

 

 

 

 

CoronaStopKaroNa nagpur corona covid 19 mharashtra india no entry for outsiders majot dicision

 

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live