कोरोना बरा होणाऱ्यांच्या संख्येत वाढ 

साम टीव्ही न्यूज
गुरुवार, 12 मार्च 2020

एका भारतीय शास्त्रज्ञाने आणि संशोधकाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची लागण झालेले पाचपैकी चार रुग्ण हे कोणत्याही विशेष औषधोपचारांशिवाय बरे होतात. केवळ पॅरासिटामॉल घेऊन हे रुग्ण बरे होत आहेत. त्यांना वेगळे कोणतेही औषध देण्याची गरज पडत नाही.  

एका भारतीय शास्त्रज्ञाने आणि संशोधकाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची लागण झालेले पाचपैकी चार रुग्ण हे कोणत्याही विशेष औषधोपचारांशिवाय बरे होतात. केवळ पॅरासिटामॉल घेऊन हे रुग्ण बरे होत आहेत. त्यांना वेगळे कोणतेही औषध देण्याची गरज पडत नाही.  
कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या जगभरात दिवसेंदिवस वाढते आहे. आतापर्यंत १००००० हून अधिक नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्याचवेळी जगभरात ४००० हून नागरिकांचा या आजाराने बळी गेला आहे. अर्थात यापैकी सर्वाधिक लोक हे चीनमध्ये मृत्युमुखी पडले आहेत. हे सगळे चित्र असतानाच कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण या आजारातून पूर्ण बरेही होत आहेत. पण त्याबद्दल कोणी फारसे बोलताना दिसत नाही.

जगातील चित्र बघितल्यास याच स्वरुपाची माहिती मिळते. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या अंदाजानुसार, १२६१३६ जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी ६८२१९ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे. याचाच अर्थ ५० टक्के रुग्ण आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत.
 

हेही पाहा ::राज्यात कोरोनाबाधिताची संख्या 11 वर

कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर त्यातून पूर्णपणे बरे होणाऱ्यांचे प्रमाणही लक्षवेधी आहे. चीनमधील राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या अहवालानुसार, चीनमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेल्या ८०००० नागरिकांपैकी ६०००० जण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. चीनमध्ये कोरोना आजारातून बरे झालेल्या नागरिकांचे प्रमाण ७० टक्के आहे. 

Web Title:Coronavirus outbreak Why no one is talking about the rate of recovery
 


संबंधित बातम्या

Saam TV Live