नगरसेवकाच्या घरी 10 हजार बाटल्या दारू

साम टीव्ही
गुरुवार, 11 मार्च 2021

नगरसेवकाच्या घरी 10 हजार बाटल्या दारू
ब्रह्मपुरीचा नगरसेवक की मद्यसम्राट
खादीच्या आड किती दारुसम्राट

 

 

 

चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी असतानाच काही लोकप्रतिनिधी दारु तस्करीत अडकल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. उत्पादन शुल्क विभागानं तब्बल 10 हजार बाटल्यांसह एका नगरसेवकाला अटक केलीय.

दारुच्या बाटल्यांची ही भींत पाहा. नशेची ही भिंत आहे लोकप्रतिनिधी म्हणून मिरवणाऱ्या ब्रह्मपुरीचा नगरसेवक महेश भर्रे याची महेश भर्रे हा काँग्रेसचा नगरसेवक आहे. दारुबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात महेश भर्रे हा दारुतस्करी करत होता. त्याची तस्करी चंद्रपुरातल्या पोलिस आणि उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना माहिती नव्हती. पण त्याची किर्ती मुंबईपर्यंत पोहचली होती. मुंबईच्या उत्पादन शुल्कच्या विशेष भरारी पथकानं ब्रह्मपुरीच्या पेठ वॉर्डातल्या घरावर छापा टाकून दहा हजार बाटल्या जप्त केल्या.महेश भर्रे निसटला मात्र त्याचा साथीदार उत्पादन शुल्कच्या ताब्यात सापडलाय.

 उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या दारुच्या साठ्यावर येत्या काळात रोडरोलर फिरवण्यात येईल. (दोन किंवा तीन वेळा शॉट्स चालवा) चंद्रपूर जिल्ह्यातला हा पहिला दारुसम्राट नगरसेवक सापडलाय. आणखी किती दारुसम्राट खादीच्या आड लपून बसलेत त्यांना शोधण्याची गरज निर्माण झालीय.
 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live