चितेवर झोपला नगरसेवक मरणानंतरही स्मशानात नरकयातना

साम टीव्ही
रविवार, 7 मार्च 2021

स्मशानभूमीचं काम रखडल्याने एका नगरसेवकाने चक्क चितेवर झोपून आंदोलन केलंय. हा प्रकार नेमका कुठे घ़डलाय. 

स्मशानभूमीचं काम रखडल्याने एका नगरसेवकाने चक्क चितेवर झोपून आंदोलन केलंय. हा प्रकार नेमका कुठे घ़डलाय. 

पुण्यातील खराडी भागातील ही स्मशानभूमी पाहा. जिवंतपणीच इथल्या नगरसेवकाला चितेवर झोपून आंदोलन करावं लागतंय. खराडी भागात स्मशानभूमी नसल्यानं मृतांवर रस्त्यावरच अंत्यसंस्कार करावे लागतात. स्मशानभूमीचं काम हाती घेतलं पण दोन वर्ष झाली ते काम पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. महापालिका स्तरावर पाठपुरावा करुनही काम पूर्ण होत नसल्याने शेवटी स्थानिक नगरसेवक भय्यासाहेब जाधव यांनी सरणावर झोपून आंदोलन केलं.

पुणे महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर नगरसेवकाचा हा स्टंट तर नाही ना अशी चर्चा परिसरात सुरू आहे.


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live