जलयुक्त शिवारमधील भ्रष्टाचार भोवला !

Beed
Beed

बीड - राज्यात खळबळ उडवून दिलेल्या, परळीतील Parli जलयुक्त Jal-Yukta शिवार Shivar योजनेतील तथाकथित भ्रष्टाचार Corruption, सेवानिवृत्त विभागीय कृषी सहसंचालकाला चांगलाच भोवला आहे. अखेर सेवानिवृत्त विभागीय कृषी सहसंचालकासह, सहा जणांवर परळी पोलीस Police ठाण्यात गुन्हा FIR दाखल करण्यात आला आहे. परळीत जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार Complaint काँग्रेसच्या Congress वसंत मुंडे Vasant Munde यांनी केली होती. 

मजूर संस्था व सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांच्या माध्यमातून हा भ्रष्टाचार झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं. या प्रकरणात परळीचे तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे  फिर्याद दिली होती.  

 हे देखील पहा - 

फिर्यादीवरून, परळी शहर पोलिस ठाण्यात सेवानिवृत्त विभागीय कृषी सहसंचालक रमेश भताने यांच्यासह भीमराव बांगर, शंकर गव्हाणे, दीपक पवार, सुनील रामराव जायभाये व सौ.कमल लिंबकर ह्या सहा आरोपी विरुद्ध जलयुक्त शिवार योजनेत सन 2015 ते 2017 दरम्यान 18 लाख 32 हजार 336 रुपयांचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी कलम 420, 408, 468, 471, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील सदर जलयुक्त शिवार योजनेच्या प्रकरणाची, कृषी खात्याच्या दक्षता पथकाकडून दोन वेळेस चौकशी करण्यात आली होती. त्यामध्ये 138 मजूर संस्था तसेच 29 गुत्तेदार व सुशिक्षित बेकार 28 अभियंत्यांवर या अगोदरच गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई झाली आहे.

मात्र राजकीय वरदहस्त असल्याने मुख्य आरोपी सेवानिवृत्त विभागीय कृषी सहसंचालक रमेश भताने  याच्यासह इतर ५ अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात येऊनही गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात येत होती.

याकडे काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी लक्ष वेधले होते. दरम्यान वसंत मुंडे यांच्या अथक पाठपुराव्यानंतर या घोटाळेबाजांवर अखेर गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे बीडसह परळीतील राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com