"जुलैमध्ये भारतात 21 लाख लोक होऊ शकतात कोरोनाने संक्रमित"

साम टीव्ही
सोमवार, 25 मे 2020
  • भारतात दर 13 दिवसात रूग्णांची संख्या दुप्पट 
  • लॉकडाऊनमध्ये दिलेली सूट महागात पडू शकते
  • जुलैच्या सुरूवातीला भारतातील रूग्णसंख्या 6 लाखांपर्यंत असेल
  • महिन्याभरात जवळजवळ 21 लाख लोक संक्रमित होतील

जुलैच्या महिन्यात भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 21 लाखांच्या घरात जाऊ शकतो. भारताबाबत हे धक्कादायक भाकित कुणी वर्तवलंय आणि कशाच्या आधारावर हा दावा केला जातोय. पाहा..

भारतात कोरोनारूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतीय. त्यातच आता एक धक्कादायक अहवाल समोर आलाय. भारतातील रूग्णवाढीचा वेग लक्षात घेता जुलै महिन्यात इथल्या कोरोना रूग्णांची संख्या 21 लाखांच्या घरात पोहचू शकते. यूनिवर्सिटी ऑफ़ मिशिगन आणि जॉन हॉपकिंस यूनिवर्सिटीनं हा इशारा दिलाय. यूनिवर्सिटी ऑफ़ मिशिगनचे बायो-स्टैटिस्टिक्स भ्रमर मुखर्जी यांनी एका मॉडेलद्वारे या धोक्याविषयी माहिती दिलीय. त्यांनी म्हंटलय

यूनिवर्सिटी ऑफ़ मिशिगनचा इशारा
भारतात दर 13 दिवसात रूग्णांची संख्या दुप्पट होतीय. अशात सरकारनं लॉकडाऊनमध्ये दिलेली सूट महागात पडू शकते. जुलैच्या सुरूवातीला भारतातील रूग्णसंख्या 6 लाखांपर्यंत असेल आणि महिन्याभरात जवळजवळ 21 लाख लोक संक्रमित होतील

फायनल व्हिओ - सध्याच्या घडीला भारतात कोरोना रूग्णांची संख्या दीड लाखांच्या आसपास आहे. तर 4 हजारांहून अधिक लोकांनी आपला जीव गमावालय. इराणला मागे टाकत भारत टॉप 10 देशांच्या यादीत आलाय. भारतासाठी ही निश्चितच चिंतेची बाब आहे. अजूनही कोरोनाच्या बाबतीत लोक फारसे गंभीर दिसत नाहीत. भविष्यातील धोका टाळण्यासाठी लोकांनी आताच सजग राहायला हवं. संयम, शिस्त आणि स्वत:ची काळजी ही त्रिसुत्रीच आता भारताला मोठ्या संकटातून वाचवू शकेल. 


संबंधित बातम्या

Saam TV Live