VIDEO| देशात फोफावतायत बनावट नोटा

संजय डाफ, सामटीव्ही, नागपूर
शनिवार, 18 जानेवारी 2020

सगळ्या नोटा दोन हजार रुपयांच्या किंवा 500 रुपये मूल्याच्या आहेत..या नोटांकडे पाहिलं तर त्या खऱ्याच वाटतात..मात्र, तसं नाही..या नोटा खोट्या आहेत..मात्र, त्या पटकन ओळखता येणार नाहीत...कारण या नोटा छापण्यासाठी आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आणि उच्च दर्जाच्या कागदाचा वापर केला जातोय..

तब्बल 18 लाख 75 हजार रुपयांच्या बनावट नोटा नागपूरमध्ये महसूल गुप्तचर विभागानं हस्तगत केल्या आणि बनावट नोटांचं रॅकेट समोर आलं...इतके दिवस पाकिस्तानातून भारतात बनावट नोटा यायच्या..मात्र, आता या नोटा बांगलादेशातून येतायत..ताजबाग परिसरात लालू खान नावाच्या व्यक्तीकडून 13 लाख 89 हजार रुपयांच्या नोटा हस्तगत केल्यात..त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून अन्य एका युवकाकडून 4 लाख 50 हजारांच्या नोटा हस्तगत केल्या..

अगदी सूत्रबद्ध पद्धतीनं बनावट नोटांचा हा धंदा सुरू होता..
या नोटा पटकन बनावट आहेत की नाही ओळखता येत नाही..मात्र, नीट पाहिल्यास त्यांची रंगसंगती बिघडलेली दिसते..तसंच रंगही निकृष्ट दर्जाचे आहेत..मात्र, अन्य बनावट नोटांप्रमाणे त्यांचा रंग बोटांना लागत नाही.. बनावट नोटांच्या 100 रुपयांसाठी 60 रुपये दिले जात होते..बेरोजगार युवकांचा वापर या नोटांच्या वाहतुकीसाठी केला जायचा..त्यासाठी त्यांना एकूण नोटांच्या मूल्याच्या 5 टक्के रक्कम दिली जात होती..

आपल्याला मिळालेल्या नोटा अनेकदा घाईगडबडीत आपण तपासून पाहात नाही..मात्र, यापुढे तुम्हाला प्रत्येक नोट तपासून घ्यावीच लागेल..नाहीतर डोक्याला हात लावायची वेळ येईल..

WebTittle::Counterfeit currency notes in the country

संबंधित बातम्या

Saam TV Live