सावधान..! राज्यात बनावट सॅनिटायझर 

सावधान..! राज्यात बनावट सॅनिटायझर 

नाशिक- नाशिकमध्ये बोगस सॅनिटायझरचा मोठा साठा अन्न आणि औषध प्रशासनाकडून जप्त करण्यात आला आहे. नाशिक शहरातील गोळे कॉलनीमध्ये 3 घाऊक औषध विक्रेत्यांच्या दुकानावर हे छापे टाकण्यात आले आहेत. या छाप्यात अन्न आणि औषध प्रशासनानं तब्बल 2 लाख रुपये किमतीचा बोगस सॅनिटायझरचा जप्त केला आहे. आऊट ऑफ स्टॉक झालेला सॅनिटायझर आता बनावट पद्धतीने विकला जात असल्याचं समोर आलं आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत  असल्याने अन्न व औषध विभागाने डॉक्टरांच्या प्रीस्क्रिपशन शिवाय मास्क विक्रीला प्रतिबंध घातला असला तरी औषध व्रिकेते गैरफायदा घेत असल्याचं दिसून येत आहे. मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा असल्याचे सांगून चढ्या दराने विक्री सुरू असून, महाराष्ट्रातील नागरिकांची होत असलेली फसवणूक रोखण्यासाठी कठोर उपाय करण्यात याव्यात, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.

मेडिकलमध्ये सध्या नागरिकांना हव्या असणारे एन 95 मास्क आणि सॅनिटायझरही गायब झाले आहेत.अचानक मागणी वाढल्याने तुटवडा सांगण्यात येत आहे.   छोट्या बॉटल्स उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्याऐवजी मोठ्या आणि ५०० रुपयांहून अधिक किमतीच्या बॉटल्स ग्राहकांच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्नही काही ठिकाणी होत आहे.तर  मुंबई मध्ये बनावट हँड सॅनिटायझर सापडल्याची घटना देखील घडली आहे.

सोबतच मेडिकल औषधी साहित्यचे उत्पादक व वितरक ह्यांची बैठक बोलवून त्यांना निर्देश देण्यात यावेत सोबतच केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनला देखील बैठकीला बोलवून त्यांना सक्त ताकीद देऊन महाराष्ट्रातील मास्क सॅनिटायझरची चढ्या दराने विक्री बाबत कार्यवाई करावी, खेळ आणि त्यांची लूट ह्यावर युद्ध पातळीवर उपाय करण्यात यावे अन्यथा अन्न व औषधी विभागाचे जिल्हा कार्यालयावर ‘वंचित’चे पदाधिकारी कार्यकर्ते बेशरमच्या फुलांचे हार अन्न व औषध विभागाचे कार्यालय प्रमुख यांना घालण्यात यातील, असा इशाराही राजेंद्र पातोडे यांनी दिला आहे.

WEB TITLE- Duplicate sanitizer in the state

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com