लॉकडाऊन होणार? सार्वजनिक वाहतुकीबाबत मोठा निर्णय येण्याची दाट शक्यता

ब्युरो रिपोर्ट
शुक्रवार, 20 मार्च 2020

आज राज्यातील कोरोना रुग्णांची संख्येत आणखी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात आता 52 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

मुंबई -  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सलग दुसऱ्या दिवशी कोरोनावरुन जनतेशी संवाद साधणार आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी याबाबतची माहिती दिली. तसंच प्रसंगी कठोर निर्णय घ्यावे लागतील असं सूचक विधानही त्यांनी केलं आहे. त्यामुळे येत्या रविवारी पंतप्रधानांनी आवाहन केलेल्या जनता कर्फ्यूच्या दिवशी राज्यात लॉकडाऊन स्थिती निर्माण होते की काय अशा चर्चांना उधाण आलं आहे. वारंवार सूचना करुनही लोकं घरी थांबण्याऐवजी सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादूर्भाव आणखी वाढण्याची भीती आहे. मुख्यमंत्री ठाकरेंनीही लोकांनी सहकार्य न केल्यास, कठोर निर्णय घेतला जाण्याबाबत विधान केलं होतं. त्यामुळे येत्या रविवारी मुंबईतील लोकलसह, एसटी आणि बेस्ट सेवा, तसंच मेट्रो, टॅक्सी सेवाही दिवसभर बंद ठेवली जाण्याची शक्यता आहे.

 

कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळण्याचं आवाहन केलं जातंय. त्यासाठी सरकारकडून खबरदारीही घेतली जातीय. मात्र या उपाययोजनांमुळेच गर्दी झाल्याचं चित्र मुंबईत पाहायला मिळालं. कोरोनामुळे अनेक मेल एक्सप्रेस रद्द करण्यात आल्यात. मात्र कोरोनाला घाबरुन अनेकजण गावी जाण्यासाठी निघालेत. त्यामुळे मुंबईच्या एलटीटी स्टेशनवर गर्दी पाहायला मिळाली. तसंच गाड्या रद्द झाल्यानं त्रास होत असल्याची प्रतिक्रिया या लोकांनी दिली आहे. दरम्यान अशा गर्दीच्या ठिकाणी एखादा कोरोना बाधित रुग्ण असल्यास, त्याच्या संपर्कात येणाऱ्या इतरांनाही कोरोनाची बाधा होण्याचा धोका आहे. त्यामुळे घाबरुन न जाता घरीच राहण्याचा सल्ला दिला जातो आहे. 

 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारीही लोकांशी संवाद साधर गर्दी टाळण्याचं आवाहन केलं होतं.  सर्वच सरकारी यंत्रणा करोनाला तोंड देण्यासाठी सज्ज असून आता राज्यातील जनतेनं सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचं पालन करून सहकार्य करावं, असं सांगण्यात आलं आहे. प्रसंगी सरकार कठोर निर्णय घेऊ शकतं, ती वेळ आणू नका, असं कळकळीचं आवाहनही त्यांनी केलं होतं दरम्यान, आज सार्वजनिक वाहतुकीबाबत काय निर्णय होतो, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 

 

आज राज्यातील कोरोना रुग्णांची संख्येत आणखी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात आता 52 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

TWEET - 

 

 

 

पाहा व्हिडीओ - 

uddhav thackrey on corona covid 19 virus maharashtra city to lock down decidision may come soon india modi

 


संबंधित बातम्या

Saam TV Live