कोरोनात लग्न! वऱ्हाड्यांना सॅनिडायझर भेट आणि लग्नाचं जेवण बंद डब्यात

navi_mumbai_marrge 960
navi_mumbai_marrge 960

वाशी - कोरोनाचा फटका सगळ्यांनाच बसतो आहे. सार्वजनिक सोहळे शक्यतो करु नका, असं आवाहन करण्यात येतं आहे. त्यात लग्नाचा सीझन आहे. अशातच लग्न पुढे ढकलणं प्रत्येकालाच शक्य होईल असं नाही. मात्र अनेक लग्न पुढे ढकलण्यात आली. मात्र वाशीतील एक लग्न काही पुढे ढकलणं एका कुटुंबाला शक्य नव्हतं. त्यामुळे या लग्नाच्या घरात चक्क कोरोनाची जगजागृती करण्याचा प्रयत्न लग्नाच्या हॉलमध्येच करण्यात आला.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाशीतील एका लग्न समारंभात जनजागृती करण्यात आली. नवी मुंबईच्या वाशीमध्ये झालेल्या एका लग्नात पाहुण्यांना चक्क हँड सॅनिटायझर पुरवण्यात आलं. तसं लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांना चक्क मास्कचं वाटप देखील करण्यात आलं. इतकंच काय तर खबरदारी म्हणून लग्नातील वऱ्हाड्यांना बंद डब्यातील जेवण देण्यात आलं. जमावबंदी असल्याने या लग्नाला दोन्ही घरातील फक्त 50 पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्न समारंभ पार पडला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या गर्दी टाळण्याचं मोठं आव्हान सगळ्यांसमोर आहे. अशातच आतापर्यंत 52 जणांना राज्यात कोरोनाची लागण झाली आहे. तर दुसरीकडे 5 जणांचा देशाता कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज कोरोनाचे तीन नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सगळ्यात जास्त सतर्क राहण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील केलेल्या आहेत. 

कोरोनामुळे नवी मुंबई,पनवेलमधील दुकानं आजपासून बंद करण्यात आली आहेत. नवी मुंबई, पनवेल महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. 31 मार्चपर्यंत फेरीवाले, खाऊ गल्ली, स्पा आणि सलूनही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

covid 19 corona virus marriage in navi mumbai marathi

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com