Covid-19: फक्त एका प्रवाशासाठी अमिरात विमानेने भरले उड्डाण 

साम टीव्ही ब्यूरो
बुधवार, 26 मे 2021

मुंबई विमानतळावरून दुबईला जाणाऱ्या EK-501 या अमिरात विमानाने फक्त एक प्रवाश्यासह उड्डाण केले गेले

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाच्या Corona Second Wave  दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजवला आहे. अमीरात ऐरलाईन्सचे Emirates flight 350 सिटर बोईंग (बी-7777) 19 मे ला एका  प्रवाशाला घेऊन मुंबईहून दुबईसाठी रवाना झाले. यापूर्वी 24 एप्रिल ला संयुक्त अरब अमिरातने भारतातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांच्या प्रवासावर बंदी घातली होती. (Covid-19: Emirates flight for one passenger only )

हे देखिल पहा - 

मुंबई विमानतळावरुण अशी माहिती समोर आली की,  मुंबई विमानतळावरून दुबईला जाणाऱ्या EK-501 या अमिरात विमानाने फक्त एक प्रवाश्यासह उड्डाण केले गेले होते. विमानाने सकाळी साडेचार वाजता उड्डाण केले. या संदर्भात विमान कंमन्यांशी संपर्क साधला असता, विमान कंपन्यांच्या जबाबदार अधिकाऱ्याने काहीही बोलण्यास नकार दिला. 

14 जूनपर्यंत विमान वाहतुकीवर बंदी -  

संयुक्त अरब अमिरातचे म्हणणे आहे की, भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गंभीर परिस्थिति निर्माण झाली आहे. त्यामुळे विमान  उड्डाणांवर  पूर्णपणे बंदी आली आहे. संयुक्त अरब अमिरातने 24 ते 14 जून या कालावधीत ही बंदी केली आहे. 

केसी वेणुगोपाल यांची दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या कुटुंबीयांशी भेट

ऑस्ट्रेलियतील विमान प्रवाश्याविना परत केले -

काही दिवसांपूर्वी अशीच एक बातमी आली होती. गेल्या महिन्यात 27 एप्रिलला एअर इंडियाच्या एका क्रू सदस्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे सिडनीहून विमान प्रवाशांविना परत आले. ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांनी प्रवाशांना विमानात चढण्यापासून रोखले आणि रिकामे विमान परत पाठविले. अधिकाऱ्यांनी प्रवाशांना पाठवले नसले तरी, काही आवश्यक वस्तू पाठविण्यात आल्या होत्या. भारतातील कोरोना विषाणूचे वाढता संसर्ग लक्षात घेता ऑस्ट्रेलियाने आधी 15 मेपर्यंत आणि आता पुढील आदेश होईपर्यंत सर्व विमानांची वाहतूक थांबविली आहे. 

Edited By - Puja Bonkile 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live