COVID-19: 'फ्लू शॉट' लस लहान मुलांवर ठरतेय गुणकारी

दिपक क्षिरसागर
रविवार, 6 जून 2021

फ्लू शॉट लस घेल्याने लहान मुलांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढत असल्याचे दिसून आले आहे.

राज्यात (Maharashtra) कोरोणाची दुसरी लाट (Corona Second Wave) आता ओसरत आहे. दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाचा आलेख हा पहिल्या लाटेपेक्षा पाच पट जास्त होता. जाणकारांच्या मते ऑक्टोबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार (Corona Third Wave) आहे आणि ही लाट प्रामुख्याने लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येणार आहे. त्यामुळे चिंता वाढली होती. मात्र फ्लू शॉट नावाच्या लसीमुळे लहान बालकांच्या आरोग्यात बदल होऊन रोग प्रतिकार शक्ती वाढत असल्याचे दिसून आले आहे.

देशात कोरोनाला हरवण्यासाठी 18 ते 45 आणि जेष्ठ नागरिकांच लसीकरण सुरू आहे. त्यामुळे या वयोगटातील नागरिकांना कोरोनाचा धोका कमी प्रमाणात टळलेला आहे. परिणामी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या ही आटोक्यात आली आहे. मात्र जाणकारांच्या मते ऑक्टोबर मध्ये कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येणार आहे आणि परिणामी लहान बालकांच्या मृत्यू संख्येतही लक्षणीय वाढ होईल. मात्र लातूरमधील भातांब्रे बाल रुग्णालयात लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी फ्लू शॉट लस दिली जात आहे.

हे देखील पाहा

फ्लू शॉट लस घेल्याने लहान मुलांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर कोरोणाला रोखण्यासाठी चांगलीच मदत होत आहे. फ्लू शॉट लस घेतल्याने कोरोना पासून बळी जाणार नाही. 6 महिन्यांच्या मुलांपासून ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना फ्लू शॉट लस द्यावी असे डॉ रविकिरण भातांब्रे यांनी सांगितले आहे.

Edited By: Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews


संबंधित बातम्या

Saam TV Live