महाराष्ट्राला दिलासा! 24 तासात राज्यात 15,077 नवीन रुग्ण

साम टीव्ही ब्युरो
मंगळवार, 1 जून 2021

मागच्या 24 तासात राज्यात 15,077  रुग्ण आढळले आहेत.  त्याचबरोबर, 33,000 रुग्णांनी कोरोनावरती मात केली आहे.

महाराष्ट्रात मागच्या काही दिवसात कोरोनाची (Coronavirus) आकडेवारी कमी होताना दिसत आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) रुग्णसंख्येचा वाढता आलेख कमी होताना दिसत आहे. परंतु, आता रुग्णसंख्या 15 हजारांवर आली आहे. महाराष्ट्रामध्ये लागू असलेले कडक निर्बंध (Lockdown) कोरोनाची आकडेवारी कमी करण्यास उपयुक्त ठरत आहेत. रुग्णसंख्या कमी होत असली तरी राज्य सरकारने 15 जूनपर्यंत लॉकडाउन कायम ठेवलाआहे. मात्र राज्याच्या काही ठिकाणी शिथिलता देणार आली आहे. (COVID-19 Maharashtra: 15,077 new patients in the state in 24 hours) 

मागच्या 24 तासात राज्यात 15,077  रुग्ण आढळले आहेत.  त्याचबरोबर, 33,000 रुग्णांनी कोरोनावरती मात केली आहे. राज्यात आतापर्यंत 57,46,892 रुग्ण आढळले असून 53,95,370 रुग्णांनी कोरोनावरती यशस्वी मात केली आहे. मागच्या 24 तासात राज्यात 184 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत देशात  95,344 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 2,53,367 अ‍ॅक्टिव रुग्ण आहेत. 3,50,55,054 नागरिकांची आतापर्यंत कोरोनाची चाचणी करण्यात आलेली आहे.

हे देखील पाहा

दरम्यान, महाराष्ट्रामध्ये ज्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 10 टक्के आहे तिथे शिथिलता देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. त्याचबरोबर ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी 20 टक्के आहे तिथे अगोदरचे निर्बंध कायम राहतील. 


संबंधित बातम्या

Saam TV Live