COVID-19 Maharashtra: 24 तासात 18,600 नवीन रुग्ण; 402 रुग्णांचा मृत्यू

साम टीव्ही ब्युरो
सोमवार, 31 मे 2021

मागच्या 24 तासात राज्यात 18,600 रुग्ण आढळले आहेत.  त्याचबरोबर, 22,532 रुग्णांनी कोरोनावरती मात केली आहे.

महाराष्ट्रात मागच्या काही दिवसात कोरोनाची (Coronavirus) आकडेवारी कमी होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात (Maharashtra) रुग्णसंख्येचा आलेख वाढता होता. परंतु, आता रुग्णसंख्या 20 हजाराच्या आत आली आहे. महाराष्ट्रामध्ये लागू असलेले कडक निर्बंध (Lockdown) कोरोनाची आकडेवारी कमी करण्यास फायदेशीर ठरले आहे. रुग्णसंख्या कमी होत असली तरी राज्य सरकार 1 जूननंतर लॉकडाउन कायम ठेवणार आहे फक्त काही प्रमाणात शिथिलता देणार आहे असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले होते.

Breaking राज्यातला लाॅकडाऊन १५ जून पर्यंत वाढवला

मागच्या 24 तासात राज्यात 18,600 रुग्ण आढळले आहेत.  त्याचबरोबर, 22,532 रुग्णांनी कोरोनावरती मात केली आहे. राज्यात आतापर्यंत 57,31,815 रुग्ण आढळले असून 53,62,370 रुग्णांनी कोरोनावरती यशस्वी मात केली आहे. मागच्या 24 तासात राज्यात 402 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत देशात  93,198 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 2,71,801 अ‍ॅक्टिव रुग्ण आहेत. 3,48,61,608 नागरिकांची आतापर्यंत कोरोनाची चाचणी करण्यात आलेली आहे.

कोरोना विषाणूची निर्मिती वुहानच्या लॅबमध्येच!; वैज्ञानिकांना मिळाला पुरावा

''दुसऱ्या लाटेवर (Corona Second Wave) आपण नियंत्रण आणतो आहोत. पण नाईलाजानं हे निर्बंध वाढवावे लागत आहेत. काही जिल्ह्यांत निर्बंध (Restrictions) शिथिल होतील, काही जिल्ह्यांत अधिक कडक करावे लागतील,'' असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज जाहीर केले.(COVID-19 Maharashtra: 18,600 new patients in 24 hours; Deaths of 402 patients)

Edited By : Pravin Dhamale

हे देखील पाहा 


संबंधित बातम्या

Saam TV Live