COVID-19 Maharashtra: 24 तासात 20,740 नवीन रुग्ण; 424 रुग्णांचा मृत्यू

साम टीव्ही ब्युरो
शनिवार, 29 मे 2021

मागच्या 24 तासात राज्यात  20,740 रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर, 31,671 रुग्णांनी कोरोनावरती मात केली आहे.

महाराष्ट्रात मागच्या काही दिवसात कोरोनाची (Coronavirus) आकडेवारी कमी होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात (Maharashtra) रुग्णसंख्येने उचचांक गाठला होता. परंतु, आता काही प्रमाणात रुग्णसंख्या कमी होत आहे. महाराष्ट्रामध्ये लागू असलेल्या कडक लॉकडाऊनचा (Lockdown) कोरोनाची आकडेवारी कमी करण्यास फायदा झाला असल्याचं राज्य सरकार सांगत आहे. रुग्णसंख्या कमी होत असली तरी राज्य सरकार 1 जूननंतर लॉकडाउन कायम ठेवणार आहे फक्त काही प्रमाणात शिथिलता देणार आहे.(COVID-19 Maharashtra 20,740 new patients in 24 hours; 424 Patient deaths)

COVID-19: मंगळवेढ्यात 41 मतीमंद मुलांना कोरोनाची बाधा

मागच्या 24 तासात राज्यात  20,740 रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर, 31,671 रुग्णांनी कोरोनावरती मात केली आहे. राज्यात आतापर्यंत 56,92,920 रुग्ण आढळले असून 53,07,874 रुग्णांनी कोरोनावरती यशस्वी मात केली आहे. मागच्या 24 तासात राज्यात 424 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत देशात  93,198 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 2,89,088 अ‍ॅक्टिव रुग्ण आहेत. 3,43,50,186 नागरिकांची आतापर्यंत कोरोनाची चाचणी करण्यात आलेली आहे.

आमदार दिलीप मोहिते पाटील हे राजकारणाला लागलेली काळी बुरशी - आढळराव पाटील  

कोरोनाविषाणू (Corona virus) साथीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात (Pune District) विकेंड लॉकडाऊन (weekend Lockdown) लागू करण्यात आला होता. मात्र आता लवकरच हा विकेंड लॉकडाऊन रद्द करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.  पुणे शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत होता. या पार्श्वभूमीवर पुण्यात विकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. मात्र आता पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्याच्या पाहायला मिळत आहे. त्यामुळेच राज्यसरकारने विकेंड लॉकडाऊनचे निर्बंध उठविण्यात येणार असल्याकचे जाहीर केले आहे.  

Edited By : Pravin Dhamale

हे देखील पाहा


संबंधित बातम्या

Saam TV Live