BIG BREAKING | पंजाबमध्ये 90 हजार NRI परत आल्याची सूत्रांची माहिती

ब्युरो रिपोर्ट
सोमवार, 23 मार्च 2020

देशातील कोरोनाचे बहुतांश रुग्ण वाढण्याचं कारण हे परदेशातून प्रवास करुन आलेलेच ठरले आहेत. अशातच जर का 90 हजार NRI पंजाबमध्ये दाखल झाल्याचं समोर आलं, तर त्यांच्यापैकी किती जणांना कोरोनाचा संसर्ग झालेला असू शकतो, याची कल्पनाच केलेली बरी.

अमृतसर - पंजाबमध्ये 90 हजार NRI आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पंजाबच्या आरोग्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला चिठ्ठी लिहिल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंजाब सरकारचे टेंशन वाढलंय. आतापर्यंत 90 हजार NRI आल्याची माहिती समोर आल्याचं सूत्रांनी सांगितल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

 

देशातील कोरोनाचे बहुतांश रुग्ण वाढण्याचं कारण हे परदेशातून प्रवास करुन आलेलेच ठरले आहेत. अशातच जर का 90 हजार NRI पंजाबमध्ये दाखल झाल्याचं समोर आलं, तर त्यांच्यापैकी किती जणांना कोरोनाचा संसर्ग झालेला असू शकतो, याची कल्पनाच केलेली बरी. शिवाय त्यांच्या चाचणीसाठी आवश्यक तेवढी आरोग्य यंत्रणा तयार आहे का, हाही एक प्रश्नच आहे. त्यामुळे सध्या 90 हजार NRIचा मुद्दा पंजाबमध्ये कळीचा मुद्दा बनलाय. 

 

NRI म्हणजे नेमकं कोण?

NRI म्हणजे Non-resident Indian and person of Indian origin. याचाच अर्थ भारतात न राहणारे भारतीय किंवा जे कामासाठी दुस-या देशात स्थायिक झाले आहेत, असे भारतीय होय.

 

संचारबंदी करणारं पहिलं राज्य

महत्त्वाचं म्हणजे पंजाबमध्येही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी संचारबंदीची घोषणा केली आहे. लॉकडाऊनला लोकांनी हरताळ पाळल्याने पंजाब सरकारला संचारबंदीचा निर्णय घ्यावा लागला आहे.  कोरोनामुळे संचारबंदी लावणारं पंजाब हे पहिलं राज्य आहे.

 

पंजाबपाठोपाठ महाराष्ट्रात कर्फ्यू

पंजाबपाठोपाठ दोन तासांच्या आतच महाराष्ट्रातही संचारबंदीची घोषणा करण्यात आली. कोरोनामुळे आतापर्यंत पंजाबमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे, तर शेवटचं वृत्त हाती येईपर्यंत पंजाबमध्ये 20 कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. कोरोनाग्रस्तांचा हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. 

 

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 400च्या पार

देशात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 433 वर पोहोचलाय. यात सर्वाधिक कोरोनाबाधिक केरळमध्ये आढळलेत. केरळमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 95 वर पोहोचलाय. तर महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 93 वर पोहोचलाय. तर देशात आतापर्यंत 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

 

पाहा व्हिडीओ - जर्मनीत अडकलेल्या बीड जिल्हाच्या केज तालुक्यातील मराठमोळ्या तरुणाची आर्त हाक ऐका, स्वतः घराबाहेर पडणं तर सोडा, कुणाला घराबाहेर तुम्ही पडूही देणार नाही!

 

 

 

 

 

 

covid 19 situation 90k nri came back to punjab marathi news

 

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live