COVID-19 Vaccination: राजस्थानात लसी सापडल्या कचऱ्यात

corona vaccine
corona vaccine

राजस्थानमध्ये लसींचा (Corona Vaccine) अपव्यय होताना दिसत आहे.  परंतु, सरकार काहीच करत नाही. राजस्थानमधील कचऱ्याची तपासणी केली तेव्हा उघडकीस आले की सरकारी कर्मचार्‍यांनी कचऱ्यात 532 वायल टाकल्या. या खुलाशांनंतर वैद्यकीय मंत्र्यांनी संपूर्ण आलेल्या लसींपैकी केवळ 2 टक्के लस खराब झाल्याचं म्हटलं आहे. परंतु, कचऱ्यातून लस उचलणाऱ्या लोकांनी सांगितले की यातील 130 वायल पूर्ण भरलेल्या आहेत. तर 100 वायल अर्ध्या भरलेल्या आहेत. (COVID-19 Vaccination: Vaccine found in waste in Rajasthan)

केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार राजस्थानात 16 जानेवारी ते 17 मे दरम्यान 11.50 लाखाहून अधिक कोरोना लसीचे डोस खराब झाले आहेत. लस वाया घालविण्याबाबत राज्य व केंद्र सरकारचे स्वत: चे वेगवेगळे आकडे आहेत. राजस्थान सरकार राज्यातील लसींचा अपव्यय केवळ 2 टक्के असल्याचे नोंदवित आहे, तर केंद्राने एप्रिलमध्ये 7 टक्के  आणि 26 मे रोजी 3 टक्के नोंदवले आहे. एका माध्यमाच्या अहवालानुसार, लसीकरण केंद्रावरच्या आकडेवारीनुसार 25 टक्के लस खराब झाल्या आहेत. 

हे देखील पाहा

२८ मे रोजी टोंक जिल्ह्यातील लांबा हरीसिंग प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील नाल्यात जळालेल्या लसीच्या वायला सापडल्या होत्या. तेथे उपस्थित डॉक्टरांना रिकाम्या वायलबद्दल विचारले असता त्यांनी जळलेल्या वायल दाखवल्या आणि म्हणाले, 'आम्ही रिकाम्या वायल जाळल्या आहेत'. डाक्टरांना अधिक माहिती विचारली असता ते म्हणाले आम्हाला संपलेल्या वायला सांभाळून ठेवायचा कुठलाही आदेश नाही. त्यामुळे, जर एखाद्या व्यक्तीने लस घेतल्यांनंतर विचारले की मला कोणत्या बॅचची लस दिली तर डॉक्टरांकडे त्याचे उत्तर नाहीये, कारण त्यांना सरकारकडून त्या संदर्भात आदेश नाही.   

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com