बारा तास बेडसाठी प्रतिक्षा; पण अखेर रुग्णाचा मृत्यू

विनोद जिरे
बुधवार, 28 एप्रिल 2021

जिल्ह्यात दिवसेंदिवस आरोग्य प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर येत आहे. जिल्हा रुग्णालयात तब्बल बारा तास एका रुग्णाला बेड उपलब्ध झाला नसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. 

बीड : जिल्ह्यात Bed वसेंदिवस आरोग्य प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर येत आहे. जिल्हा रुग्णालयात तब्बल बारा तास एका रुग्णाला Patient बेड उपलब्ध झाला नसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. Covid Patient Died after search of Bed for Twelve hours

काल पहाटे तीनच्या सुमारास गणेश पाडुळे या तरुणाला रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र दुपारी दोन वाजेपर्यंत बेड उपलब्ध झाला नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या Doctor दुर्लक्षामुळे आणि हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप, त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. कोरोना चाचणी निगेटीव्ह Negative आल्यानंतर देखील, हा मृत्यू झाला कसा झाला? असा प्रश्न देखील नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. 

या घटनेनंतर नातेवाईकांनी जिल्हा शल्यचिकित्सक सुखदेव राठोड यांच्याकडे जाब विचारला आहे. मात्र रुग्णालय प्रशासनाने यात हात झटकले आहेत. त्यामुळे यातील दोषींवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी मृताच्या नातेवाइकांनी केली आहे. तब्बल बारा तास बेड मिळण्यासाठी या रुग्णाला वणवण करावी लागली. मात्र अखेर शेवटी त्याला मृत्यूने गाठलंच..!
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live