कोविड सेंटरमधून पळालेले 'ते' अखेर परतले!

Yavatmal Covid Centre
Yavatmal Covid Centre

यवतमाळ : करोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनासह प्रशासन प्रयत्नशिल असताना बेजबाबदार नागरिक या प्रयत्नांवर पाणी फेरत आहेत.यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे असाच एक संतापजनक प्रकार घडला. येथील आयटीआय कॉलेजमध्ये असलेल्या कोविड केअर सेंटरमधून तब्बल २० करोनाबाधित रुग्णांनी पलायन केले होते. प्रशासनाच्या प्रयत्नानंतर या वीस जणांना पुन्हा कोविड सेंटरमध्ये परत आणण्यात यश आले आहे. Covid Patients ran away from Yavatmal Centre returned back

येथील आयटीआय कॉलेजमध्ये ITI College असलेल्या कोविड केअर सेंटरमधून तब्बल २० करोनाबाधित रुग्णांनी पलायन केल्याचे समोर आले. यानंतर प्रशासनाने शोधमोहीम राबवून सापडलेल्या काही रूग्णांना गृहविलगीकरणात ठेवले. यवतमाळ जिल्ह्यात Yavatmal दररोज कोरोनाबाधितांची संख्या सरासरी एक हजाराने वाढत आहे.

काल शनिवारी घाटंजी तालुक्यात ४५ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. सौम्य लक्षणे असलेल्या बाधितांना गृहविलगीकरणात ठेवण्यात येते. शुक्रवारी तालुक्यातील आमडी येथे कोरोना चाचणी शिबीर घेण्यात आले. या ठिकाणी तब्बल १७ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या.

त्यांना घाटंजी येथे आयटीआय कॉलेजमध्ये  ITI College तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरला Covid Centre दाखल करण्यात आले होते. दरम्यान, काल शनिवार) या कोविड केअर सेंटरमधून  तब्बल २० करोनाबाधित पळून गेल्याचे समोर आल्याने आरोग्य विभागाच्या पायाखालीची जमीन सरकली. Covid Patients ran away from Yavatmal Centre returned back

अखेर या सर्वांना शोधण्यात आले.  पलायन केलेल्या लोकांचे समुपदेशन करण्यात आले. अखेर २० जण कोरोना सेंटर मध्ये पुन्हा परत आले.  वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या रुग्णांना पुन्हा दाखल करुन घेतले आहे. कोरोना सेंटरवर आता पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. कोरोना सेंटरमधून पळून गेलेले हे रुग्ण आमडी नावाच्या एकाच गावातील आहेत.

या सर्वाना कोरोनाची सौम्य लक्षणे होती. या कारणामुळे त्यांना घाटंजीच्या कोरोना सेंटरमध्ये भरती करण्यात आले होते. लक्षणे सौम्य असल्याने या रुग्णांना फारसा त्रास नव्हता. प्रशासन कोरोनाचे कारण समोर करीत आपल्याला उगीच डांबवून  ठेवत असल्याची भावना या रुग्णांमध्ये होती. याच कारणाने या रुग्णांनी कोरोना सेंटरमधून  पलायन केले होते. अखेर प्रशासनाने या लोकांशी समजून काढल्यावर हे सर्व पुन्हा परत आले.
Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com