मुलीच्या लग्नात भाजप आमदार महेश लांडगेंनी कोरोना नियमांना पायदळी तुडवले 

गोपाल मोटघरे
सोमवार, 31 मे 2021

भाजपचे ​आमदार महेश लांडगे यांनी त्यांच्या मुलीच्या लग्न समारंभातील मांडव टहाळ्याच्या कार्यक्रमात त्यांच्या समर्थकांसह कोरोना नियमांची पूर्णपणे पायमल्ली केली आहे.

पिंपरी-चिंचवड : भाजपचे BJP आमदार MLA महेश लांडगे Mahesh Landge यांनी त्यांच्या मुलीच्या लग्न Marriage समारंभातील Function मांडव टहाळ्याच्या कार्यक्रमात त्यांच्या समर्थकांसह Supporters कोरोना  Corona नियमांची Rules पूर्णपणे पायमल्ली Violation केली आहे. Covid Rules Violation By BJP MLA Mahesh Landge 

या मांडव टहाळ्याचा कार्यक्रमात स्वतः महेश लांडगे भंडाऱ्यात नाहून नृत्य Dance करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहेत. त्यांच्या मुलीचा विवाहसोहळा 6 जूनला होणार आहे. त्यापूर्वीच्या सोहळ्यात अपवाद वगळता आमदारांसह सगळेच विनामास्क वावरताना या व्हिडीओत दिसत आहेत.

हे देखील पहा -

तर सोशल डिस्टनसिंगचा पूर्णपणे फज्जा या कार्यक्रमात उडालाअसल्याचे समोर आले आहे. मांडव टहाळ्याच्या कार्यक्रमासाठी वाजंत्री, बैलजोड्याचं आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे सर्वसामान्याना वेगळे आणि आमदार खासदार श्रीमंतांना वेगळे नियम आहेत का असा सवाल आता सामान्य नागरिक करत आहेत. Covid Rules Violation By BJP MLA Mahesh Landge 

धनंजय मुंडेंचा अनोखा सेवाधर्म 75 कुटुंबातील विवाहांना प्रत्येकी 10 हजारांची मदत..!

सदर कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत. आता पिंपरी-चिंचवड महापालिका Muncipal Corporation तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस Police कोरोना नियमांची पायमल्ली करणाऱ्या या आमदार महाशयांवर काय कारवाई Action करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Edited By : Krushanrav Sathe


संबंधित बातम्या

Saam TV Live