मोठी बातमी! जगातली पहिली कोरोना लस तयार, वाचा सविस्तर...

साम टीव्ही
मंगळवार, 11 ऑगस्ट 2020
  • जगातली पहिली कोरोना लस तयार
  • रशियानं तयार केली पहिला कोरोना लस
  • रशियाच्या आरोग्य मंत्रालयाची लसीला मंजुरी
  • पुतीन यांच्या मुलीला दिली गेली कोरोना लस

आतापर्यंतची सर्वात मोठी ब्रेकींग न्यूज, कोरोनाची पहिली लस तयार झाली आहे. रशियानं ही लस तयार केलीय. रशियाच्या आरोग्य विभागानं या लसीला मान्यता दिलीय. विशेष म्हणजे या लसीचा पहिला डोस पुतीन यांच्या मुलीला देण्यात आला आहे. मॉक्सोच्या गामेल्या इन्स्टिट्युटनं ही लस विकसित केली आहे. आज या लसीला रशियाच्या आरोग्य विभागाकडून मान्यता देण्यात आलीय.

रशिया लवकरच या लसीच्या उत्पादनाला सुरुवात करणार असल्याचं राष्ट्रपती पुतीन यांनी जाहीर केलंय. कोरोना लस तयार करणारा रशिया हा पहिला देश ठरला आहे. रशियाकडून लवकरच जगभरात या लसीचा पुरवठा केला जाणार असल्याचंही सुत्रांकडून सांगण्यात येतंय. या लसीला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळणं बाकी आहे, ही मान्यता मिळाल्यानंतर पुढच्या ६ महिन्यात लसीचे कोट्यवधी  डोस तयार केले जातील असं कळतंय. आणि विविद देशातही ही लस पाठवली जाऊ शकते.


संबंधित बातम्या

Saam TV Live