कोरोना पाठोपाठ म्युकर मायकोसिस आजारावरील रुग्णांसाठी स्वतंत्र वार्डची निर्मिती

meucormysios
meucormysios

नंदुरबार : नंदुरबार Nandurbar जिल्ह्यात कोरोना Corona बाधित रुग्णांच्या संख्येत घट होताच म्युकर मायकोसिस Mucor Mycosis आजाराने डोकं वर काढलं आहे. जिल्हा ग्रामीण रुग्णालयात या आजारावर उपचारासाठी वेगळ्या वॉर्डची निर्मिती करून आरोग्य विभागाने Health Department उपचाराला सुरुवात केली आहे. Creation of separate wards for patients with mucormycosis in nandurbar

हे देखील पहा -

सध्या स्थितीत 50 पेक्षा अधिक रुग्ण दाखल आहेत. जिल्‍हाधिकारी कार्यालयात Collector Office झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत म्युकर मायकोसिस आजाराने बाधित रुग्णांच्या उपचाराबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी पालकमंत्री के सी पाडवी C. K. Padvi यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा ग्रामीण रुग्णालयात बाधित रुग्णांवर उपचाराला सुरुवात झाली आहे. 

या आजारावरील रुग्णांच्या उपचारासाठी लागणाऱ्या इंजेक्शन व पुरेसा औषधसाठा उपलब्ध करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या. कोरोना महामारीच्या संकटा बरोबरच म्युकर मायकोसिस आजाराचे गंभीर रुग्ण जिल्ह्यात आढळून येत असल्याने आरोग्य विभागासह जनसामान्यातून चिंता व्यक्त केली जात आहे. 

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com