#Crime नांदेडमध्ये मठात घुसून महाराजांसह दोघांची निर्घृण हत्या

साम टीव्ही
रविवार, 24 मे 2020

साधूच्या हत्येनं नांदेड हादरलं 

मठात घुसून महाराजांसह दोघांची निर्घृण हत्या

पालघर मध्ये दोन साधूंची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असताना नांदेडमध्ये एका साधूचा गळा आवळून खून करण्यात आल्याची धक्कादाक घटना समोर आलीय. या घटनेमुळे नांदेड पुरतं हादरलंय. 

नांदेड जिल्ह्यातल्या उमरी तालुक्यातील नागठाणा एका धक्कादायक हत्याकाडांनं पुरतं हादरलंय. इथले बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांचा रात्री दीड वाजताच्या सुमारास खून झालाय. या घटनेनं भाविकांमध्ये एकच खळबळ उडालीय. गावातीलच एका माथेफिरू तरुणानं महाराजांच्या मठात प्रवेश केला त्यांच्याजवळील ऐवज लुटला आणि त्यानंतर गळा दाबून खून केला. ज्या मठामध्ये शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांचा खून करण्यात आला त्याच मठातील बाथरूममध्ये आणखी एक मृतदेह सापडला असून असून मृत व्यक्तीचं नाव भगवान शिंदे असं आहे. 
 

कोण होते पशुपतीनाथ महाराज

  • पशुपतीनाथ महाराज मुळचे कर्नाटकातील बेल्लारी येथील रहिवासी  
  • लिंगायत धर्म प्रसार करण्यात मोठा वाटा 
  • 500 हून अधिक मंदिरांचं कलाशारोहण 
  • व्यसनमुक्ती, दारू मुक्तीसाठी मोठं योगदान 
  • महाराष्ट्र तसच कर्नाटकात एक लाखांच्यावर शिष्य
  • 2008 मध्ये पट्टाधीश सोहळा गादीवर बसले
  • 35 वर्ष गादीला उत्तराधिकारी नव्हता

 

पशुपतीनाथ महाराज मुळचे कर्नाटकातील बेल्लारी येथील रहिवासी होते. 
लिंगायत धर्म प्रसार करण्यात त्यांचा मोठा वाटा राहिलाय. 500 हून अधिक मंदिरांचं कलाशारोहण त्यांच्या हस्ते झालंय. व्यसनमुक्ती, दारू मुक्तीसाठी त्यांनी मोठं योगदान दिलं असून, महाराष्ट्र तसच  कर्नाटकात त्यांचे एक लाखांच्या वर शिष्य आहेत. 2008  मध्ये ते पट्टाधीश सोहळा गादीवर बसले. 35 वर्ष या गादीला उत्तराधिकारी नव्हता

याआधी पालघरमधील साधूंच्या हत्येनं महाराष्ट्र हादरला होता. आता ही दुसरी घटना घडल्यानं याचे पडसाद देशभर उमटणार हे स्वाभाविक आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live