धक्कादायक! बाईकची चावी दिली नाही म्हणून बापाचा जीव घेतला

Bhnadara_muder
Bhnadara_muder

भंडारा - मुलांचा हट्ट आईबाप जीवाचा आटा पिटा करुन पुरवतात. आईबापांनी हट्ट पुरवला नाही मुलं हट्ट पुरवून घेण्यासाठी काय वाट्टेल ते करण्यासाठी तयार असतात. पण भंडाऱ्यातील एका धक्कादायक घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे बापलेकाच्या नाताल्या काळीमा फासला गेलाय. 

बाईकची चावी दिली नाही म्हणून मुलानेच बापाचा खून केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यामध्ये घडली आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील केसलवाडा मध्ये ही धक्कादायक घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे.  गुरुवारी 5 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी हा प्रकार घडला आहे. बापाची हत्या करणाऱ्या मुलाचं वय अवघं 21 वर्ष असल्याचं समोर आलंय. 

21 वर्षीय  लोकेश टिचकुलेचे नेहमीच आपल्या वडिलांशी खटके उडायचे.  52 वर्षीय वडिलांशी खटके उडाल्यानं तो नेहमी नाराज असायचा. गुरुवारी त्याचा वडिलांशी बाईकची चावी देण्यावरुन वाद झाला.  हा वाद विकोपाला गेला. लोकेशने आपल्या वडिलांकडे बाईकची चावी मागण्यावरुन वादाला सुरूवात झाली आणि हा वाद शेवटचा ठरला.

हा वाद इतका विकोपाला गेला की या वादातून रागावलेल्या वडिलांनी आधी लोकेशला काठीने मारलं. यानंतर प्रचंड संतापात असलेल्या लोकेशने तिच काठी आपल्या वडिलांच्या डोक्यात घातली. यामध्ये लोकेशच्या वडिलांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या डोक्यातून होत असलेल्या अतिरक्तस्त्रावामुळे वडील ताराचंद टिचकुले यांचा मृत्यू झाला. 

विशेष म्हणजे सर्व प्रकारानंतर आरोपी मुलगा स्वत:हून पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला आणि घडलेल्या गुन्ह्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. सध्या पोलिस याप्रकरणी आता अधिक तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. एका क्षुल्लक कारणामुळे वडिलांवर हल्ला करुन त्यांचा जीव घेणाऱ्या या मुलाबाबात भंडाऱ्यात एकच दहशत पसरली आहे. 

पाहा व्हिडीओ - 

bhandara crime murder son killed father bike key 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com