लॉक डाउनमुळे लिंबू उत्पादकांवर ओढावले संकट.. 

lemon india
lemon india

धुळे : कोरोनाचा Corona प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे लॉकडाउन Lockdown लावण्यात आला आहे. त्यामुळेच सर्व हॉटेल, रेस्टॉरंट त्याचबरोबर आईस्क्रीमचे दुकाने व सरबतची दुकान बंद ठेवण्यात आली आहेत. याचाच फटका लिंबू उत्पादक शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात बसतांना दिसत आहे. ही सर्व दुकाने बंद असल्यामुळे नींबूची मागणी घटली आहे. Crisis on lemon growers due to lockdown

उन्हाळा म्हणलं की लिंबू सरबत पिण्याकडे सर्वांचाच कल वाढलेला असतो. त्यामुळे परिणामी उन्हाळ्यात लिंबूना भावदेखील चांगला मिळत असतो. परंतु, सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉक डाउन करण्यात आले आहे. लॉक डाउनमुळे लिंबूचा Lemon सर्वात जास्त वापर केला जात असलेले हॉटेल Hotels, रेस्टॉरंट Restaurant तसेच आईस्क्रीमचे दुकाने आणि सरबतचे दुकानच बंद असल्यामुळे बाजारामध्ये लिंबूची मागणी घटली आहे.  

हे देखील पहा -

भर उन्हाळ्यामध्ये लिंबूला भावच मिळत नाही. एकीकडे कोरोनामुळे बागेत लिंबू तोडण्यासाठी मजूर चढ्या दराने मजुरी मागत आहेत. तर दुसरीकडे बाजारामध्ये लिंबूला भाव मिळत नाही. लिंबू न काढताच गळून पडत असल्यामुळे लिंबू उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. Crisis on lemon growers due to lockdown

शेतकऱ्यांच्या farmers डोळ्यादेखत लिंबूचा बहर न काढताच जमीनदोस्त होत असल्यामुळे लिंबू उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. एकेकाळी उन्हाळ्यामध्ये लिंबू उत्पादक शेतकऱ्यास सोन्याचे दिवस बघावयास मिळत होते. परंतु, सध्या लॉक डाउनमुळे त्याच शेतकऱ्यांवर हाताशपने जमीनदोस्त झालेले लिंबू बघण्याची वेळ ओढावली आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या लिंबू उत्पादक शेतकऱ्यांस सरकारतर्फे मदत मिळावी अशी मागणी या शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com