बापरे! भांडूपमध्ये 3 फुटाची मगर आढळ्यानं एकच खळबळ

सिद्धेश सावंत
शुक्रवार, 20 मार्च 2020

विहार तलावातून ही मगर पालिकेच्या शुद्धीकरण केंद्रात अडकल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. पाणी शुद्धीकरण केंद्राच्या मार्गात चुकून आली असावी, असादेखील अंदाज बांधला जातो आहे. 

मुंबई - मुंबईच्या भांडूपमध्ये चक्क मगर आढळून आली आहे. 3 फुटाची नगर आढळल्यानं एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, या मगरीला सुखरुप जीवदान देण्यात आलं आहे. 3 फुटाची मगर बीएमसीच्या पाणी शुद्धीकरण केंद्रात अडकून पडली होती. मात्र ही मगर पाणी शुद्धीकरण केंद्रात आली कशी काय, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. 

विहार तलावातून ही मगर पालिकेच्या शुद्धीकरण केंद्रात अडकल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. पाणी शुद्धीकरण केंद्राच्या मार्गात चुकून आली असावी, असादेखील अंदाज बांधला जातो आहे. 

शुद्धीकरण केंद्रातून बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग नसल्यानं ही मगर तिथेच अडकून पडली असावी, असा बोललं जातंय. रेसकीन असोसिएशन या संस्थेने या मगरीला जीवदान दिलं आहे. या मगरीला रेस्क्यू करणा-या पवन शर्मा यांनी विहार लेकमधून ही मगर आली असण्याचा अंदाज बांधल आहे. संजय गांधी नॅशनल पार्कच्या बाजूलाच विहार तलाव आहे. या मार्गातूनच ही मगर आली असेल आणि मार्घ भटकून या ठिकाणी अडकून पडली असावी, असं पवन शर्मा यांनी म्हटलंय. 

सध्या ही मगर वन विभागाकडे सुपूर्त करण्यात आली असून आता तिची वैद्यकीय चाचणी करुन पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे. दरम्यान, 5 जानेवारीला मुलुंडमध्येही मगर आढळून आली होती. आतापर्यंत आपण गाव खेड्यांमधल्या नद्यांमध्ये मगरीचा वावर असल्याचं ऐकलंय आणि पाहिलंय...मात्र आता मुंबईच्या मुलुंड भागात मगर आढळल्यानं खळबळ उडाली होती. मुलुंडच्या स्वप्ननगरी परिसरामध्ये  एका विकासकाने इमारतीच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यामधल्या पाण्यात ही मगर आढळली होती. ही मगर आढळल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. या परिसरात ही मगर कशी आणि कुठून आली याबाबत असा प्रश्न उपस्थित झाला होता.

हेही वाचा- हत्तीचं पिल्लू चक्क 5 तास का रडत होतं?

हेही वाचा - माचिसच्या गंधकाने विंचवाचं विष उतरतं?

 

पाहा व्हिडीओ - 

 

crocodile-rescued-from-water-purification-plant-in-bhandup-mumbai


संबंधित बातम्या

Saam TV Live