मलंग गड परिसरातील डोंगरांवर तळीरामांचा हैदोस... 

साम टीव्ही ब्युरो
मंगळवार, 13 एप्रिल 2021

मलंग गडच्या डोंगरांवर सध्या तळीरामांनी चांगलाच धुडगूस घातला आहे. डोंगरांवर बाटल्या फोडून काचांचे तुकडे पडलेले सर्वत्र दिसत आहेत. हा प्रकार सर्वाधिक खरड गावाजवळील डोंगरांवर दिसून आला आहे

कल्याण : मलंगगडच्या Malanggad डोंगरांवर सध्या तळीरामांनी चांगलाच धुडगूस घातला आहे. डोंगरांवर बाटल्या फोडून काचांचे तुकडे पडलेले सर्वत्र दिसत आहेत. हा प्रकार सर्वाधिक खरड khard गावाजवळील डोंगरांवर दिसून आला आहे. मात्र या तळीरामांचा योग्य समाचार घेण्यासाठी पोलिसांनी Police ऍक्शन मोड वर येण्याचं सोडून बघ्याची भूमिका घेतल्याने तळीरामांच देखील चांगलंच फावलं असल्याचं दिसून आले आहे. A crowd of drunk people in the area of Malang Fort

मिनी लॉकडाऊन Mini Lockdown झाल्यापासून मलंग गड रोडवरील डोंगरांवर मोठ्या प्रमाणात तळीरामांनी मोर्चा वळवला आहे. मात्र शहरात सापडत नसलेला मद्याचा साठा ग्रामीण भागात तळीरामांना मिळतो कुठे ? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. तर याच डोंगराच्या परिसरात तळीरामांसाठी रात्री उशिरापर्यंत चायनीज सेंटर देखील तयार असल्याने तळीराम मात्र बिनधास्तपणे आपला आनंद साजरा करत आहेत. 

मात्र, दारू पिऊन झाल्यानंतर त्याच डोंगरांवर बाटल्या फोडून काचा, कचरा करत असल्याचं दिसून येत आहे. दररोज सायंकाळी अंधार झाले, की तळीरामांना वेध लागतात. ते या डोंगरांवर दारू पिण्यास येतात. मात्र, ही दारू तळीरामांना कुठून मिळते. हे मात्र सध्या गुलदस्त्यातच आहे. A crowd of drunk people in the area of Malang Fort

हिललाईन पोलिसांनी Police सध्या मोठ्या प्रमाणात मलंग गड परिसरात बंदोबस्त तैनात केला आहे. मात्र रात्रीची पोलिसांची गस्त तोकडी पडत असल्याने तळीराम मात्र आपला दारू पिण्याचा उत्सव आनंदात साजरा करत आहेत. त्यामुळे या तळीरामांना आता कोण वठणीवर आणणार असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.

Edited By- Digambar Jadhav

 


संबंधित बातम्या

Saam TV Live