लामजना लसीकरण केंद्रावर  तोबा गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

vaccination centre
vaccination centre

लातूर - जिल्ह्यातील औसा Ausa तालुक्यातील लामजना Lamjana परिसरात तसेच आजूबाजूच्या  गावात कोरोनाचा Corona  प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून त्याला आवर घालण्यासाठी नागरिक कोरोना प्रतिबंधक लस Vaccine घेण्यासाठी केंद्रावर गर्दी करत आहेत. या लसीकरण केंद्रावर Vaccination Centre नागरिकांची तुडुंब गर्दी Crowd दिसून येत असून शासनाने नेमून दिलेल्या नियमांना हरताळ फासला जात आहे. लसीकरण  केंद्रावर वारंवार सूचना देऊनही काही नागरिक शिस्तीचे पालन करताना दिसत नाही आहेत.  crowd at Lamjana vaccination center
 
लस घेण्यासाठी  नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत त्यातच प्रशासनाकडून योग्य प्रकारे नियोजन व माहिती नागरिकांना दिली जात नसल्याने  केंद्रांवर गर्दी होत आहे. ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने जिल्हा प्रशासनामार्फत संपूर्ण जिल्हाभर कोरोना निर्बंध देखील लादले जात आहेत. त्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापने बंद ठेवून कडक निर्बंध लावण्यात आले असतांना देखील रुग्ण संख्या वाढत आहे.

हे देखील पहा -

ऑक्सिजन बेड व इंजेक्शनचा वेळेत पुरवठा न झाल्याने अनेक रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. त्याला प्रतिबंधक घालण्यासाठी नागरिक कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी गर्दी करत आहेत. लामजना  येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण केंद्र असल्याने आरोग्य केंद्रावर सकाळपासून लोकांची गर्दी वाढू लागली आहे. crowd at Lamjana vaccination center

त्यात योग्य नियोजन नसल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडताना दिसत आहे. दरम्यान आरोग्य विभागाकडून जनतेला फिजिकल डिस्टन्स ठेवा, मास्कचा वापर करा, कोरोना लसीकरण केंद्रावर गर्दी करू, नका, शिस्त पाळा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Edited By- Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com