रत्नागिरीत मुंबईकरांची गर्दी, प्रशासनावर मोठा ताण 

 रत्नागिरीत मुंबईकरांची गर्दी, प्रशासनावर मोठा ताण 

रत्नागिरी: मुंबईतून येणारे ६० टक्के नागरिक पास घेऊन तर ४० टक्के नागरिक कोणतीही परवानगी न घेता येत आहेत. गंभीर बाब म्हणजे मुंबईतून रत्नागिरी जिल्हा प्रशासनाला कल्पना न देता परस्पर परवानगी दिली गेल्याचेही समोर आले आहे.
 
अचानक उसळलेल्या या गर्दीने प्रशासनावर मोठा ताण आला असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात चालली आहे. याबाबत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा
मुंबई, ठाणे परिसरात करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागल्याने येथून मोठ्या संख्येने लोक गावाकडे निघाले असून रत्नागिरीत गेल्या काही दिवसांत मुंबई परिसरातून येणाऱ्या लोकांची संख्या वाढल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. 


दिवसेंदिवस जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाल्याचे चित्र आहे. हे चित्र असेच राहिल्यास व रुग्णालयांतील जागा अपुरी पडल्यास भविष्यात करोना पॉझिटिव्ह रुग्णांना देखील होम क्वारंटाइन करावे लागू शकते, असे सांगितले जात आहे.
मुंबई व इतर जिल्ह्यांतून रत्नागिरीत प्रचंड संख्येने येणाऱ्या लोकांमुळे जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात ४०० करोना पॉझिटिव्ह व १५०० सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता आहे. 

जिल्ह्यात करोना रुग्ण वाढत आहेत. सोमवारी सायंकाळी ६ जणांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून त्यातील ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर १ अहवाल निगेटिव्ह आला आहे. अन्य एक अहवाल अपुरा नमुना असल्याने प्राप्त होऊ शकला नाही. आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये २ रुग्ण रत्नागिरी येथील नर्सिंग सेंटरमधील आहेत तर एक रुग्ण रत्नागिरी परिसरातील रहिवासी आहे. 


शहरातील दुकाने काही नियम व अटींवर सुरू करण्यास परवानगी दिली जाणार असून आता प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीवर ती उघडायची आहेत. स्वतःची काळजी घेत आता पुढील काळात करोनासोबत जगणे अपरिहार्य आहे, असे जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

रत्नागिरीतून करोना चाचणीसाठी सांगलीतील प्रयोगशाळेत स्वॅब पाठवण्यात येत होते. मात्र, हे स्वॅब आता नाकारण्यात येत असल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेपुढे नवा प्रश्न निर्माण झाला आहे. सांगलीत जिल्ह्यातून १७०० स्वॅब पाठवण्यात आले होते. 

WebTittle :: Crowd of Mumbaikars in Ratnagiri, great stress on the administration


 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com