दारुची दुकानं सुरु होताच तळीरामांची झुंबड उडाली आणि...

साम टीव्ही
सोमवार, 4 मे 2020
  • अनेक दुकानांबाहेर मद्यपींच्या रांगा
  • आजपासून देशभरात दारु विक्रीला परवानगी
  • दारु खरेदीवेळी सोशल डिस्टन्सिंग पाळा!

आजपासून अटी-शर्तींसह वाईन शॉप उघडण्याची परवानगी देण्यात आलीय. त्यामुळे तब्बल महिन्याभराच्या कालावधीनंतर उघडलेल्या दारु दुकानांबाहेर राज्यभरात मोठी गर्दी झाली... मुंबईतही मद्यप्रेमींनी मोठी गर्दी केली. शिस्तीत रांग लावून दारु खरेदी करण्यासाठी अनेकजण आज घराबाहेर पडले. माहिम, माटुंग्यातील दारुच्या दुकानांबाहेर कशा पद्धतीने लोकांनी गर्दी केली होती आणि त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा कसा फज्जा उडला, हे आज पाहायला मिळालं. दरम्यान, दुकानं उघडण्याआधीच अनेक ठिकाणी तळीराम दारुच्या दुकानाबाहेर रांग लावून उभे होते. 

पुण्यातही तळीरामांनी दारुच्या दुकानाबाहेर गर्दी केली आहे. दुकानं उघण्याआधीच सकाळ सकाळी तळीराम दारुच्या दुकानासमोर हजर झालेत. अनेकांनी गर्दी केल्यानंतर शटर उघण्याआधी तळीरामांनी अक्षरशः रांगा लावत सोशल डिस्टन्सिंग पाळलं.
दरम्यान, पुण्यात जशी गर्दी पाहायला मिळाली, तशीच गर्दी सांगलीतही दिसून आली आहे. तळीरामांनी दारुच्या दुकानाबाहेर गर्दी केल्यानं पोलिस आणि प्रशासनासमोरची आव्हानं येत्या काळात वाढतील, अशीच चिन्ह सध्यतरी दिसताएत. पुणे आणि सांगली दोन्ही ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. या दोन्ही हॉटस्पॉटच्या ठिकाणी ज्या पद्धतीने लोकांनी दारु खरेदीसाठी केलेली गर्दी चिंतेचा विषय ठरु शकते. 

ठाण्यातील दारु दुकानंही आज उघडलीत. दारु खरेदीसाठी ठाणेरांनीही गर्दी केलीये. ठाण्यातील तीन पेट्रोल पंप,मखमली तलाव,नौपाडा या ठिकाणी रांगा लावण्यात आल्या होत्या.पण या वेळी सोशल डिस्टन्स पाळण्यात यावे यासाठी  पोलिसांनी देखील खबरदारी घेऊन वाइन शॉपसमोर गर्दी न करण्याचे आवाहन केलंय. सकाळपासून दारुच्या दुकानांसमोर मोठी गर्दी झाल्यानं प्रशासनासमोरची आव्हानंही वाढली आहेत. 

नवी मुंबईच्या घणसोलीमधली दृश्यं समोर आली आहे. याठिकाणी तळीरामांनी दारुच्या दुकानाबाहेर गर्दी केली आहे. दुकान उघडण्याआधी लोकं दारुच्या दुकानांबाहेर रांगा लावत होते,. तर इकडे बेलापुरातही तळीरामांनी दारुच्या दुकानाबाहेर रांगा लावल्यात. 

पालघरच्या बोईसरमध्ये देखील हीच परिस्थिती आहे. सकाळपासूनच बंद असलेल्या वाईन शॉप बाहेर तळीरामांना रांगा लावल्यात. सोशल डिस्टंन्सिंगचं पालन करत लोकं रांगेत उभे आहेत. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी अद्याप कोणताच आदेस दिला नसल्याने बोईसरमधील कोणतेच वाईन शॉप सध्या तरी उघडे असल्याचे दिसले नाहीत.

वसई विरारमध्ये दारुची दुकानं उघडणार या अफवेमुळे तळीरामांनी सकाळी ७ वाजल्यापासून गर्दी केली होती. तळीराम दारूच्या दुकानावर रांगा लावून उभे होते. मागील दीड महिन्यापासून बंद असलेली दारूची दुकानं आज उघडणार या आशेने दारूच्या दुकानावर आज गर्दी पाहायला मिळाली. लोकांनी एकाच गर्दी केल्याने सोशल डिस्टन्सिंगची फज्जा उडलेली पहायला मिळाली. ही गर्दी पांगवण्यासाठी शेवटी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. पोलिसांनी रांगेत उभ्या असलेल्या लोकांना पळवून लावलंय. या नंतर दुकानदारांनी 'दारूची दुकाने उघडली जाणार नाहीत' असे फलक लावले आहेत.. यामुळे तळीरामांची मात्र पूर्णतः निराशा झाली आहे. 

खासदार इम्तियाज जलील यांनी दारुविक्रीच्या निर्णयाला कडाडून विरोध

खासदार इम्तियाज जलील यांनी दारुविक्रीच्या निर्णयाला कडाडून विरोध केलाय. दारु दुकानं सुरु केल्यानं मोठा गोंधळ उडण्याची भीती जलील यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे औरंगाबादेत जर का दारुची दुकानं उघडण्यात आली, तर ती आम्ही बंद पाडू, असा इशाराच खासदार इम्तियाज जलील यांनी दिलाय. जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनालाही त्यांनी दारुची दुकानं सुरु करण्यास परवानगी देऊ नये, असं आवाहन केलंय. मात्र तरीही दारुची दुकानं उघडण्यात आली, तर मात्र लॉकडाऊनचे नियम तोडून ही दुकानं बंद करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा इम्तियाज जलिल यांनी दिलाय. दारुची दुकानं सोडून इतर सर्व दुकानं सुरु करण्यास आमचा कोणताही विरोध नसल्याचं जलील यांनी म्हटलंय.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live