निष्काळजीपणाचा कळस, असला बेजबाबदारपणा तुमच्याच अंगलट येईल...

साम टीव्ही
मंगळवार, 16 मार्च 2021

कोरोना वाढत असताना मुंबईकर बिनधास्त
दादरच्या भाजी मंडईत तुफान गर्दी
दादरमध्ये भरला कोरोनाचा बाजार?

 

 

>

मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची शक्यता खुद्द महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केलीय. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मुंबईकर कोणतेही नियम पाळताना दिसत नाही.

मुंबई कोरोनाचा हॉटस्पॉट झाला असताना मुंबईतील दादर पश्चिमेच्या भाजी बाजारातली ही गर्दी पाहा. कोरोनाचं उच्चाटन झाल्याच्या अविर्भावात तुफान गर्दी झाली होती. बहुतांश लोकांच्या तोंडावर मास्कही नव्हता. या गर्दीतल्या माणसं जणू कोरोनाची दूत बनून आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेलं आवाहन. दिलेले इशारे याचा काहीही फरक मुंबईकरांना पडलेला नाही.

 नियम पाळायचे नाही. सरकारनं कठोर कायदा केला तर सरकारच्या नावानं शंख करायचा मुंबईकरांच्या या दुटप्पी वागण्याची मोठी किंमत महाराष्ट्राला मोजावी लागणार आहे.
 
 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live