समित्यांच्या फाईल स्वाक्षरीच्या प्रतीक्षेत; सांस्कृतिक विभागाकडून नियुक्‍त्यांचे प्रस्ताव रखडले

समित्यांच्या फाईल स्वाक्षरीच्या प्रतीक्षेत; सांस्कृतिक विभागाकडून नियुक्‍त्यांचे प्रस्ताव रखडले

मुंबई : सांस्कृतिक विभागाच्या प्रस्तावांवर मंत्र्यांच्या स्वाक्षऱ्या न झाल्यामुळे नव्या समित्यांच्या "नस्त्या' रखडल्या आहेत. रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, विठाबाई नारायणगावकर पुरस्कार व प्रभाकर पणशीकर पुरस्कार समित्या गठित झाल्याच नाहीत. अशा अनेक समित्यांवरील नियुक्‍त्या एका स्वाक्षरीच्या प्रतीक्षेत आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पूर्वीच्या महायुती सरकारच्या काळातील समित्या बरखास्त करण्यात आल्या. त्या समित्यांवरील सदस्यांची नव्याने नियुक्ती झाल्यानंतरच पुढील कामकाज सुरू करता येईल. या नियुक्‍त्यांचे प्रस्ताव सांस्कृतिक विभागाने राज्यमंत्र्यांकडे पाठवले आहेत. त्यांच्या स्वाक्षरीनंतरच हे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी कॅबिनेट मंत्र्यांकडे पाठवण्यात येतील, परंतु मंत्रालयातून या नियुक्‍त्यांच्या प्रस्तावांना अद्याप मंजुरी मिळालेली नाही, असे सांगण्यात आले.

मराठी संगीत रंगभूमीला 175 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त इतिहास उलडणारा ग्रंथ दर्शनिका विभाग तयार करणार आहे. हा ग्रंथ तीन खंडांत प्रसिद्ध करण्यात येणार असून पहिल्या भागाचे काम 2021 पर्यंत पूर्ण करावयाचे आहे. या ग्रंथाच्या निर्मितीसाठी तत्कालीन सरकारने नेमलेली समिती नव्या सरकारने बरखास्त केली आहे. त्यामुळे या ग्रंथांच्या निर्मितीचे काम थांबले आहे. रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाकडे 60 हून अधिक संहिता संमतीच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगण्यात आले.

WebTittle :: Cultural Committee Appointments Pending in Maharashtra

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com