पुण्यात उद्यापासून सायं. ६ ते दुसऱ्या दिवशी सहापर्यंत सात दिवस संचारबंदी

साम टीव्ही ब्युरो
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

शहरात कडक निर्बंध लावून सुद्धा कोरोना परिस्थिती हाताबाहेर चाललेली दिसून आली. त्यामुळे कोरोनाचा हा वाढता आलेख रोखण्यासाठी सायंकाळी सहा ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा दरम्यान संचारबंदी लागू करण्यात आली आहे

पुणे : जिल्ह्यातला कोरोनाचा वाढता आलेख रोखण्यासाठी उद्या (ता. ३) सायंकाळी सहा ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा दरम्यान संचारबंदी (Curfew) लागू करण्यात आली आहे. सात दिवस हे निर्बंध राहणार आहेत.

शहरातील हाॅटेल, बार, माॅल, चित्रपटगृहे पुढील सात दिवस पूर्ण बंद राहणार आहेत. सोबतच ३० एप्रीलपर्यंत राज्यातील शाळा, काॅलेजही बंद ठेवण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. Curfew in Pune from Tomorrow Six PM to Six Am for Seven Days

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या (Corona) रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. काल एका दिवसात तब्बल ८००१ रुग्ण सापडले आहेत. शहरात कडक निर्बंध लावून सुद्धा कोरोना परिस्थिती हाताबाहेर चाललेली दिसून आली. त्यामुळे पुण्यात नवे निर्बंध लावण्यात येणार आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यातील कोरोना वाढ आणि लॉकडाऊन (Lockdown) संदर्भात २ एप्रिल म्हणजेच आजपर्यंत निरीक्षण करणार असल्याचे सांगितले होते. यावर अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक (Meeting) झाली. सर्व लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी (Senior Administrative Officer) आणि प्रशासनातील पोलिस अधिकारी (Police Officers) हे सर्व या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत जवळपास सर्वच बैठकीतील लोकप्रतिनिधींनी लाॅकडाऊन नको पण कडक निर्बंध लागू करा असा  सूर लावून धरला होता. 

सुमारे चार तास ही बैठक सुरु होती. बैठकीनंतर हाॅटेल, बार, माॅल, चित्रपटगृहे पुढील दोन आठवडे पूर्ण बंद राहणार आहेत. ३० एप्रीलपर्यंत राज्यातील शाळा काॅलेजही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली. Curfew in Pune from Tomorrow Six PM to Six Am for Seven Days

आजच्या बैठकीत झालेले निर्णय: उद्यापासून नवे निर्बंध लागू- 

 • १) सायंकाळी सहा ते दुसऱ्या दिवशी सहा या वेळात सात दिवसांसाठी संचारबंदी राहील. 
 • २) दिवसा जमावबंदी रात्री संचारबंदी लागू 
 • ३) हॉटेल, सिनेमागृह, मॉल, बार- रेस्टॉरंट सात दिवसांसाठी पूर्णपणे बंद राहतील. 
 • ४) होम डिलिव्हरी सुरु राहणार
 • ५) सर्व धार्मिक स्थळे सात दिवसांसाठी बंद राहतील. 
 • ६) पीएमपीएमएलची सेवा सात दिवसांसाठी बंद राहील. 
 • ७) ३० एप्रिलपर्यन्त शाळा, कॉलेज बंद राहतील. 
 • ८) ठरलेले लग्न सोहोळे ५० टक्के उपस्थितीने संपन्न होऊ शकतात.  
 • ९) विवाह व अंत्यसंस्कार सोडून अन्य कुठल्याही सामाजिक, सार्वजनिक, राजकीय कार्यक्रमांना  परवानगी नसेल. 
 • १०) उद्याने सायंकाळी बंद राहतील. 

  पुणे जिल्याची २४ तासातील कोरोना स्थिती - 
  पुणे जिल्यातील काळ कोरोना मुळे झालेलया मृतांच्या संख्येने दहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तसेच काल ८०११ नवे रुग्ण आढळून आले आहेत.  कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या ६४,८३८ एवढी आहे. तर दिवसभरात ६५ लोक मृत्युमुखी पडले आहेत.    

  Edited by-Sanika Gade
   


  संबंधित बातम्या

  Saam TV Live