Exclusive आधीच कोरोनाचे संकट, त्यात बँक खात्यांवर सायबर हल्ला

प्रदीप भणगे
गुरुवार, 15 एप्रिल 2021

खातेदाराच्या सेविंग आकाऊंट ,पेन्शन आकाऊंट मधून भली मोट्ठी  रक्कम गेल्याने नागरिकांना चांगलाच फटका बसला आहे. बँकेतून पैसे निघाल्याचे कळताच नागरिकांनी जवळच्या पोलीस स्थानकात धाव घेतली. ​

डोंबिवली: डोंबिवलीच्या Dombivali फडके रोड येथील आय.डी.बी.आय IDBI बँकेतून गुडीपाडवाच्या दिवशी अनेकांच्या बँक खात्यातून Bank accounts परस्पर पैसे गेल्याची घटना घडली आहे. आधीच कोरोनाचे Corona संकट आणि त्यात भर म्हणून नववर्षाच्या पहिल्या दिवशी आय.डी.बी.आय बँकेत IDBI Bank सायबर हल्ला Cyber Attack झाल्यामुळे बँक खातेदारांना जबर फटका पडला आहे. Cyber attack on citizens bank account in Dombivli

खातेदाराच्या सेविंग आकाऊंट ,पेन्शन आकाऊंट मधून भली मोट्ठी  रक्कम गेल्याने नागरिकांना चांगलाच फटका बसला आहे. बँकेतून पैसे निघाल्याचे कळताच नागरिकांनी जवळच्या पोलीस Police स्थानकात धाव घेतली. आणि पैसे अकाउंट मधून पैसे गायब झाल्याची माहिती दिली. याची तक्रार दाखल सुद्धा केली आहे.

यासंदर्भात बँक प्रबंधकाना  विचारलं असता वरिष्ठांकडे तक्रार दिली आहे, सायबर हल्ला कसा झाला याची चौकशी सुद्धा आम्ही करतो असे बँकेकडून सांगण्यात आले आहे. मात्र कॅमेऱ्या समोर बोलण्यास नकार दिला. नागरिकांनी यासर्व व्यथा साम टीव्ही च्या कॅमेरा समोर मांडल्या आहेत. 

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live