VIDEO बापरे! यंदा उन्हाळा 6 महिन्यांचा असणार? पाहा कसा असेल परिणाम?

साम टीव्ही
शुक्रवार, 12 मार्च 2021

उन्हाळा होणार 6 महिन्यांचा
वैज्ञानिकांचा गंभीर इशारा
शेती, मानवी आरोग्यावर परिणाम

 

 

 

 

 

 

 

 

 

ग्लोबल वॉर्मिंगमुळे आता उन्हाळा तब्बल सहा महिन्यांचा होणारेय. एका आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेने ही  भीती व्यक्त केलीय. 

ग्लोबल वॉर्मिंगमुळे चालू शतक संपेपर्यंत वातावरणात मोठा बदल होण्याची भीती संशोधकांनी व्यक्त केलीय. त्यामुळे उत्तर गोलार्धात उन्हाळ्याचा कालावधी सहा महिने होईल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आलाय. गंभीर बाब म्हणजे या बदलाचा शेती, मानवी आरोग्य आणि एकूणच पर्यावरणावर खोलवर परिणाम होणार आहे. 

चीनमधील विज्ञान अकादमीने ‘जिओफिजिकल रिसर्च लेटर्स’ या नियतकालिकात एक अहवाल प्रसिद्ध केलाय. या अहवालात 1952 ते 2011 पर्यंतच्या नोंदींचा अभ्यास करून उत्तर गोलार्धातील चार हंगामांमधल्या बदलांची नोंद घेण्यात आली. या नोंदीनुसार वसंत ऋतू आणि उन्हाळा अपेक्षेपेक्षा लवकर सुरु झाला, तर शरद ऋतू आणि हिवाळा अपेक्षेपेक्षा उशिराने सुरु झालाय. बदलाचा हा वेग कायम राहिल्यास उत्तर गोलार्धात या शतकाच्या अखेरीस हिवाळा दोन महिन्यांपेक्षा कमी काळ असेल, तर उन्हाळा सहा महिने असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. 

VIDEO | हा वरातीतला मोर पाहिला का? लग्नाच्या वरातीत मोर डान्सची धूम

https://www.saamtv.com/did-you-see-peacock-dhoom-peacock-dance-wedding-1...

या वातावरण बदलाचा मोठा परिणाम पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर होण्याचा अंदाज आहे. 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live