कृषिमंत्री दादा भुसे यांचा कोकण दौरा, कोकणात कृषी विकास समित्या स्थापन करणार

साम टीव्ही ब्युरो
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

कोकणातल्या विविध पिकांच्या नियोजनासाठी प्रत्येक गावात कृषी समित्या स्थापन केल्या जातील असे आश्वासन राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी आपल्या कोकण दौऱ्यात दिले.

रत्नागिरी :  कोकणातल्या Konkan विविध पिकांच्या नियोजनासाठी प्रत्येक गावात कृषी समित्या स्थापन केल्या जातील असे आश्वासन राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे Dada Bhuse यांनी आपल्या कोकण दौऱ्यात दिले. Dada Bhuse Say assures to establish Agriculture Development Committees in Konkan

गेले अनेक वर्षांपासून खरीप हंगामासाठी महाराष्ट्र (Maharashtra) पातळीवर नियोजन केलं जात आहे.  या वर्षांमध्ये प्रथम गाव पातळीपासूनचं कृषी विकास समिती (Agriculture Development Committee) स्थापन केलेली आहे. त्या गावाच्या पंचकृषींमध्ये येणाऱ्या पावसाळ्यामध्ये पाण्याची काय परिस्थिती असते प्रामुख्याने कोणती पिके घेतली जातात आणि किती खतांची बियाण्याची आवश्यकता आहे याच नियोजन गाव पातळीपासून करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतलेला आहे. त्याच्यासाठी प्रत्येक गावामध्ये कृषी समित्या स्थापन केल्या जाणार आहेत, असे भुसे यांनी सांगितले.

कृषिमंत्री दादा भुसे Dada Bhuse कोकणातले काजूगर Cashew खत उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा केली. काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या Farmers समस्यांबाबत कृषीमंत्री दादा भुसे शेतांच्या बांधावर जाऊन कोकणातल्या काजूगर खात शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत (Satish Sawant) देखील उपस्थित होते. Dada Bhuse Say assures to establish Agriculture Development Committees in Konkan

आफ्रिकेतील (Africa) काजू  महाराष्ट्रामध्ये येतो, परंतु आफ्रिकेतील काजू आणि त्याची क्वालिटी कोकणातल्या काजूच्या तुलनेत कमी असते परंतु तो काजू दिसण्यास थोडासा पांढराशुभ्र असतो. आणि तो कमी दरामध्ये आपल्याकडे येतो. यामुळे लोक हा काजू घेण्यास पसंती दर्शवितात. त्यामुळे आफ्रिकेतल्या काजूची आवक वाढत आहे.  आणि आवक वाढल्यामुळे   चा परिणाम थेट कोकणातील काजू मागणी वर होतो आहे.  आपल्या काजू उत्पादकांना म्हणावा तसा मोबदला मिळत नाही. म्हणून आम्ही सर्व शेतकऱ्यांचा एकत्रितपणे संघ करून मग गट शेती असेल किंवा फार्मर प्रोड्यूसर (Farmer Producer) कंपनी यांच्या माध्यमातून त्यांना प्रक्रिया उद्योग देण्याचा निर्णय केलेला आहे, असे भुसे यांनी सांगितले.

Edited by- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live