रजनीकांत यांना ५१वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

Rajanikanth
Rajanikanth

नवी दिल्ली: अभिनेता-राजकारणी रजनीकांत (Rajinikanth) यांना २०१९ चा ५१ वा दादासाहेब फाळके पुरस्कार (Dadasaheb Phalke Award) जाहीर झाला आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली. Dadasaheb Phalke Award Announced to Rajanikanth

"भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक महान अभिनेते रजनीकांत  यांना २०१९  चा ५१ वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आनंद झाला आहे. अभिनेते, निर्माता आणि पटकथा लेखक म्हणून त्यांचे योगदान उत्कृष्ट आहे," असे ट्विट प्रकाश जावडेकर (Prakash Jawadekar) यांनी केले आहे. रजनीकांत यांचे वय ७१ आहे, भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठित कलाकारांपैकी ते एक आहे. 

त्यांनी राघंगल या तामिळ चित्रपटातून पदार्पण केले. रजनीकांत यांना त्यांच्या 'बिल्ला' या सिनेमाने खरी ओळख दिली. याच सिनेमावरुन नंतर बॉलिवूडमध्ये (Bollywood) 'डॉन' (DON) या सिनेमाची निर्मिती करण्यात आली. रजनीकांत यांनी तामिळ, मल्याळी, हिंदी, इंग्रजी, बंगाली अशा वेगवेगळ्या भाषांमधून सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. बॉलिवूडमध्ये 'अंधा कानून' सिनेमातून त्यांना महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत चाहत्यांची पसंती मिळवली. तर त्यानंतर हम, रा,वन, अगाज, रोबोट, शिवाजी द बिग बॉस, अशा अनेक हिंदी सिनेमातून त्यांनी काम केले आहे.     
(51st Dadasaheb Phalke Award announced to Rajinikanth.)

Edited By-Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com