दिनांक : 4 मे 2021 - असा असेल आजचा दिवस

साम टिव्ही ब्युरो
मंगळवार, 4 मे 2021

मेष :

व्यवसायाची नवीन शाखा सुरू करू शकाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

वृषभ :

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. तुमचा जनसंपर्क वाढेल.

मिथुन :

काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

मेष : व्यवसायाची नवीन शाखा सुरू करू शकाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

वृषभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. तुमचा जनसंपर्क वाढेल.

मिथुन : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

कर्क : अपेक्षित सुसंधी लाभेल. आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल.

सिंह : हितशत्रुंवर मात कराल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता आहे.

कन्या : नवीन परिचय होतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

तुळ : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

वृश्‍चिक : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. कामे मार्गी लागतील.

धनु : आर्थिक लाभ होतील. व्यवसायामध्ये प्रगतीचे वातावरण राहील.

मकर : अपेक्षित संधी लाभेल. मान व प्रतिष्ठा लाभेल.

कुंभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

मीन : तुमचा जनसंपर्क वाढेल. अपेक्षित गाठीभेटी होतील.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live