अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यामुळे कांद्याची चाळ जमीनदोस्त

अभिजीत घोरमारे
सोमवार, 17 मे 2021

तौत्के वादळाचा प्रभाव धुळ्यात देखील जाणवला आहे. या वादळाच्या पार्श्‍वभूमीवर काल दिवसभर धुळ्यामध्ये ढगाळ वातावरण सह अधूनमधून पावसाच्या सरी कोसळताना दिसून आल्या. परंतु संध्याकाळी अधिक वादळी वाऱ्याची तीव्रता वाढल्याचे दिसून आले.यामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱयामुले कांद्याचे नुकसान झाले आहे.

धुळे : तौत्के वादळाचा Tauktae storm प्रभाव धुळ्यात Dhule देखील जाणवला आहे. या वादळाच्या पार्श्‍वभूमीवर काल दिवसभर धुळ्यामध्ये ढगाळ वातावरण सह अधूनमधून पावसाच्या सरी कोसळताना दिसून आल्या. परंतु संध्याकाळी अधिक वादळी वाऱ्याची तीव्रता वाढल्याचे दिसून आले. यामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे कांद्याचे नुकसान झाले आहे. Damage to onion crop due to unseasonal rains and strong winds

हे देखिल पहा

धुळे जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी देखील कोसळल्या. परंतु धुळे तालुक्यातील नेर Ner परिसरामध्ये सुमनबाई माळी यांच्या मालकीच्या शेतात उभारलेली कांद्याची चाळ वाऱ्याचा जोर वाढल्याने जमीनदोस्त झाली. यामध्ये 15 ते 20 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

उस्मानाबाद कोरोनाचा शिरकाव 

या कांद्याच्या चाळीमध्ये असलेला हजारो क्विंटल कांदा अवकाळी पावसाच्या पाण्यामुळे खराब झाला. यावर कृषी विभागाने Agriculture department त्या नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live