धरणांमुळे शेतकऱ्यांचं मरण, बॅकवॉटरचा गावाला वेढा

साम टीव्ही
शनिवार, 6 मार्च 2021

 धरण शेतकऱ्यांसाठी वरदान ठरतं. पण गोसीखुर्द धरणाचं नियोजनच ठिकठिकाणी फसलंय. धरणामुळं शेतकऱ्यांचं मरण झालंय.
 

गोसीखुर्द धरणामुळं भंडारा जिल्ह्यातल्या शेकडो शेतकऱ्यांचं मरण झालंय. गोसीखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळं मांडवी आणि बेरोडी गावाला पाण्याचा वेढा पडलाय. इथल्या शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून शेतावर जावं लागतंय.

भंडारा जिल्ह्यातल्या पवनी तालुक्यातल्या मांडवी गावातील शेतकऱ्यांची गोसीखुर्द धरणाच्या बॅकवॉटरनं कोंडी केलीय. धरणाच्या पाण्यानं मांडवी, बेरोडी  गावाला वेढा पडलाय. त्यामुळं गावातल्या शेतकऱ्यांना शेतावर जाण्यासाठी तराफ्यातून जावं लागतं. तर जनावरांना थेट पाण्यात सोडण्यावाचून पर्याय नाही. शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून नाला ओलांडावा लागतो.

 धरण शेतकऱ्यांसाठी वरदान ठरतं. पण गोसीखुर्द धरणाचं नियोजनच ठिकठिकाणी फसलंय. धरणामुळं शेतकऱ्यांचं मरण झालंय.

 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live