Video | मेट्रो आहे की डान्सबार? मेट्रोमधील ही दृष्य बघाल तर चकित व्हाल!

साम टीव्ही
गुरुवार, 21 जानेवारी 2021

मेट्रो आहे की डान्सबार असा प्रश्नदेखील उपस्थितांच्या मनात नक्कीच आला असणार. मेट्रोमधील या हुल्लडबाजीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतरही नागपूर मेट्रो प्रशासनाकडून या प्रकाराकडे कानाडोळा करण्यात येतोय. 
 

नागपूरकरांच्या सेवेसाठी वाजतगाजत मेट्रो सेवा सुरू झाली. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद देखील दिला. त्यातच या मेट्रोची लोकप्रियता वाढावी. यासाठी प्रशासनाकडून छोट्या कार्यक्रमांसाठी अवघ्या 3 हजार रुपये प्रतितास मेट्रो भाडेतत्तावर देण्याची योजना अंमलात आणण्यात आली.

नागपूरकरांनीदेखील भाड्यावर घेतलेली मेट्रो ही आपल्या मालकीची असल्यासारखी वापरण्यास सुरुवात केलीय. अशाच एका धक्कादायक प्रकाराचा एक्सक्लुझिव्ह व्हिडीओ साम टीव्हीच्या हाती लागलाय. मेट्रोमध्ये आयोजित एका कार्यक्रमात काही महाभागांनी चक्क सुरक्षा रक्षकांसमोरच जुगाराचा डाव मांडला. तसंच धावत्या मेट्रोमध्ये डान्सचाही कार्यक्रम रंगला. या ठिकाणी काही तृतीयपंथींना नाचवण्यात आलंय तर चक्क जुगाराचे डाव मांडण्यात आलेत. हा सर्व प्रकार बघून गृहमंत्र्यांच्या शहरातच अशा प्रकारचा थिल्लरपणा होत असेल तर अतिशय लाजिरवाणी गोष्ट म्हणावी लागेल.

पाहा या थिल्लरपणाचा हा व्हिडिओ -
 

यावेळी ही मेट्रो आहे की डान्सबार असा प्रश्नदेखील उपस्थितांच्या मनात नक्कीच आला असणार. मेट्रोमधील या हुल्लडबाजीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतरही नागपूर मेट्रो प्रशासनाकडून या प्रकाराकडे कानाडोळा करण्यात येतोय. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live