जिंतूर तालुक्यातील डोंगराळ भागात आढळला 'स्वर्गीय नर्तक' पक्षी

राजेश काटकर
सोमवार, 26 एप्रिल 2021

येथील जिंतूर तालुक्यात दुर्मिळ आढळून येणाऱ्या पक्षांपैकी 'स्वर्गीय नर्तक' हा नुकताच एका पक्षीमित्राला दुसऱ्यांदा तालुक्यातील घेवडा परिसरातील डोंगरात भटकंती करताना आढळून आला

परभणी : येथील Parbhani जिंतूर तालुक्यात दुर्मिळ आढळून येणाऱ्या पक्षांपैकी 'स्वर्गीय नर्तक' हा नुकताच एका पक्षीमित्राला दुसऱ्यांदा तालुक्यातील घेवडा परिसरातील डोंगरात भटकंती करताना आढळून आला. Terpsiphone paradisi असे शास्त्रीय नाव असलेल्या स्वर्गीय नर्तक या पक्षाला इंग्रजीत  Asian Paradise flycatcher म्हणतात. Dancing Bird Found in Jintur Forest

हा भारतातील जंगलात सर्वत्र आढळणारा पक्षी Bird आहे. या पक्षाचे डोके काळ्या रंगाचे असून नर व मादीला लाल रंगाची लांब शेपूट असते त्यातील दोन पिसे रिबिनीसारखे लांब असतात. डोक्यावर लहानसा तूरा असतो.डोळ्याभोवती निळ्या रंगाची कडा असते.पूर्ण वाढ झालेला नर पक्षाचा रंग पांढरा असतो. डोळ्याभोवती आकर्षक निळ्या रंगाची कडी असते.

माशा, किटक, फुलपाखरे हे या पक्षाचे खाद्य असून ते कोलांट्याउड्या मारत पकडतो.जिंतूर JIntur तालुक्यातील डोंगराळ भागात हा पक्षी आढळतो.अतिशय देखणा असलेला हा स्वर्गीय नर्तक मध्यप्रदेश राज्यपक्षी असल्याचे पक्षीमित्र रोहित गोपाळराव जोशी गेल्या काही वर्षांपासून पक्षी व निरनिराळे प्राणी यांचे निरीक्षण व छायाचित्रण करतात.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live