लक्षणं नसलेल्या कोरोनाग्रस्तांकडूनही धोका? कसा? वाचा...

साम टीव्ही
शुक्रवार, 10 जुलै 2020
  • लक्षणं नसलेल्या कोरोनाग्रस्तांकडूनही धोका?
  • लक्षणं नसलेल्या रुग्णांकडूनही कोरोनाचा प्रसार?
  • आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संशोधकाचा धक्कादायक दावा

आता बातमी चिंतेत भर टाकणारी. काहीही लक्षणं नसलेल्या रुग्णांकडूनही कोरोनाचा प्रसार होऊ शकतो, असा दावा जागतिक कीर्तीच्या संशोधकांनी केलाय.

काही दिवसांआधी WHO दावा केला होता की, लक्षणं नसलेले रुग्ण कोरोनाचा प्रसार करत नाहीत, मात्र आता WHO च्या दाव्याला खोटं ठरवणारं संशोधन समोर आलंय. कोरोनाची कुठलीही लक्षणं नसलेले रुग्णही कोरोनाचा प्रसार करू शकतात असा दावा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक डॉ. रेयान स्टँटन यांनी केलाय. 

लक्षणं नसलेल्या रुग्णांकडून कोरोना प्रसार?
कोरोनाची लक्षणं नसलेले रुग्णही कोरोनाचा प्रसार करू शकतात. त्याचसोबत कोरोनाची प्राथमिक लक्षणं असलेले रुग्ण कोरोनाच्या प्रसाराला मोठा हातभार लाऊ शकतात. असाही दावा डॉ. रेयान स्टँटन यांनी केलाय.

कोरोनाच्या जागतिक संकटात मोठ्या प्रमाणात संशोधन होतंय. त्यातच काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेनं लक्षणं नसलेल्या रुग्णांकडून कोरोनाचा प्रसार होत नसल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र डॉ. रेयान स्टँटन यांनी केलेल्या नव्या दाव्याने चिंतेत भर पडलीय. त्यामुळे लक्षणं असू किंवा नसू आणि कोरोना असू किंवा नसू... प्रत्येकानेच आता अधिकची काळजी घ्यायला हवी.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live